
Floodwaters submerge sugarcane fields in Solapur district, severely affecting nearby sugar mills.
Sakal
सोलापूर: अतिवृष्टीसह महापुरामुळे जिल्ह्यात सीना अन भीमा नद्याकाठी शेतात आठवडाभर पाणी साचून राहिल्याने उसाचे चिपाड झाले आहे. त्यामुळे सुमारे १५ ते २० लाख टन उसाचे नुकसान झाल्याचा कारखानदारांचा अंदाज आहे. मागील वर्षी झालेल्या १०३.७४ लाख टन गाळपामध्ये यंदा साधारण २० टक्क्यांहून अधिक उसाचे चिपाड होण्याची शक्यता आहे. यंदा गाळप हंगाम चांगला चालेल, असा कारखानदारांचा अंदाज होता. मात्र, या नुकसानीमुळे सीनाकाठच्या उसावर अवलंबून असलेल्या १० हून अधिक कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होणार आहे.