Kolhapur : थेट अन्नाबरोबरच ‘फूड कार्ड’ योजनाही लवकरच सुरू करणार!

विविध संकल्पना यशस्वी; शहरातील सेवाभावी व्यक्ती, संस्थांचा पुढाकार
Food Card scheme kolhapur Various concepts succeed charitable
Food Card scheme kolhapur Various concepts succeed charitable sakal

कोल्हापूर : दातृत्वाचा झरा आणि कोल्हापूर हे एक अतुट समीकरणच. साहजिकच इथं शक्यतो कुणीच उपाशी राहत नाही. भुकेलेल्यांसाठी गेल्या काही वर्षात येथे अनेक संकल्पना यशस्वी झाल्या. अशा घटकांपर्यंत थेट ताज्या अन्नाबरोबरच शिल्लक, कोरडे खाद्यपदार्थ पोचवले जातात.

काही सेवाभावी व्यक्ती, संस्थांनी तर शहरातील विविध ठिकाणी कायमस्वरूपी ही सेवा उपलब्ध केली आहे. दरम्यान, ‘फूड कार्ड’ ही संकल्पनाही लवकरच शहरात आकारास येत आहे. त्यासाठी काही संस्थांही पुढे सरसावल्या आहेत.

Food Card scheme kolhapur Various concepts succeed charitable
Kolhapur News : सतेज पाटील, महाडिकांनी माफी मागावी; आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी

कायमस्वरूपी सेवा अशी

श्री महालक्ष्मी अन्नछत्र. श्री अंबाबाई भक्त मंडळातर्फे रोज अन्नछत्र सुरू आहे. मात्र, काही मंडळी थेट अन्नछत्रापर्यंत पोहचू शकत नाहीत. गंगावेश परिसरात राजेंद्र चव्हाण आणि सहकाऱ्यांचा ‘उत्तरेश्वर थाळी’ हा उपक्रम सुरू आहे. दसरा चौकात उदय प्रभावळे आणि सहकाऱ्यांचा ‘कोल्हापुरी थाळी’ हा उपक्रम सुरू आहे.

वाढदिवस, स्मृतिदिन अशी विविध औचित्ये साधून येथे रोज अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो. छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयाच्या परिसरात ‘विथआर्य’ या संस्थेच्या माध्यमातून दररोज दुपारी मोफत खिचडी आणि केळी दिली जातात. शीतल भाटकर आणि विक्रांत भाटकर यांनी आपल्या मुलाच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी हा उपक्रम राज्यभर सुरू केला. ‘सीपीआर’मध्ये माऊली सोशल सर्कल संस्थेच्या माध्यमातून उपक्रम सुरू असल्याचे राज जैन यांनी सांगितले.

‘रॉबिनहूड आर्मी‘चे पथक

`विविध कार्यक्रमात शिल्लक राहिलेले चांगले अन्न टाकू नका, ते आमच्याकडे सोपवा…!’ ही संकल्पना घेऊन ते अन्न संकलन करून गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी रॉबिनहूड आर्मी शहरात सात वर्षे कार्यरत आहे. साडेतीनशेहून अधिक जणांची ही टीम असून, कोणत्याही ऑफिसशिवाय केवळ सोशल मीडियावरून हा उपक्रम चालतो.

ज्यांच्याकडे अन्न शिल्लक असेल त्यांनी संस्थेकडे माहिती दिली की संस्थेचे कार्यकर्ते ते संकलित करतात आणि गरजू भुकेलेल्यापर्यंत पोचवतात. त्याशिवाय गरजूंना ब्लॅंकेट, दिवाळीला धनगरवाड्यांवर जावून तेथील लोकांना फराळ वाटप आदी कामेही सेवाभावी वृत्तीने सुरू असल्याचे अमित जैन, ऐश्वर्या मुनीश्वर सांगतात.

‘ओपन फ्रीज''ची संकल्पना

येथील राजवीर बिर्याणीचे सतीश पोवार, रामेश्वर पतकी यांनी दोन वर्षांपूर्वी भुकेलेल्यांसाठी ‘ओपन फ्रीज’ची संकल्पना पुढे आणली. सुरुवातीला राजारामपुरी परिसरात हा उपक्रम सुरू केला. मात्र, सध्या आर. के. नगर आणि देवकर पाणंद परिसरात हा उपक्रम सुरू आहे.

हॉटेलमध्ये ऑर्डर केल्यानंतर जर ग्राहकांकडून चांगले अन्न शिल्लक राहिले तर असे अन्न पँकेट करून ते या उपक्रमातून गरजूंपर्यंत पोचवले जाते. त्याशिवाय या ठिकाणी मोकळा फ्रीज किंवा टेबल उपलब्ध असतो. तेथे कुणाला गरजूंसाठी अन्न किंवा कोरडे पदार्थ द्यायचे असतील तर तेही देऊ शकतात. हे संकलित पदार्थ मग गरजूपर्यंत पोचवले जातात, असे श्री. पतकी सांगतात.

‘सरप्लस फूड'चा पहिला परवाना

केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार जिल्ह्यातील शिल्लक अन्न जमा करून घेण्यासाठी मंगळवार पेठेतील प्रशांत मंडलिक यांच्याकडे परवाना आहे. गेल्या वर्षे दिवाळीत त्यांच्याकडे तब्बल सात क्विंटल फराळ संकलित झाले आणि या संकलित फराळाचे वाटप गरजू व निराधारांना केले गेले.

Food Card scheme kolhapur Various concepts succeed charitable
Kolhapur : तनवडीच्या जवानाची गळफासाने आत्महत्या

श्री. मंडलिक यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून दिलेला पश्चिम महाराष्ट्रातील पहिला परवाना आहे. शिल्लक अन्न गरजूंना देण्यासाठी त्यांना अनेकांचे दूरध्वनी येतात आणि सर्वांना ते सकारात्मक प्रतिसाद देतात. उपक्रमाला दीड वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘स्वामी विवेकानंद’चा सेवाभाव

मंगळवार पेठेतील साठमारी भागातील श्री स्वामी विवेकानंद अाश्रमतर्फे गरिबांचीही दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने गरजूंना दरवर्षी दिवाळीदिवशी गोडगोड जेवण, किमान आठवडा पुरेल इतके फराळाचे साहित्य, नवीन कपडे दिले जातात. गेली ९० वर्षांहून अधिक काळ हा सातत्याने समाजसेवी उपक्रम राबविला जात आहे. अशी माहीती आनंदराव पायमल यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com