सोलापूर : नव वर्षात वन विभागाचा ‘मियावाकी’ वर भर

पक्षी मित्र संमेलन, बिबट्या मानव संघर्ष कार्यशाळा आणि ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला होणार प्रारंभ
solapur
solapursakal

सोलापूर : गतवर्षात वनविभागाने (District Forest Department Office)अतिक्रमण हटविण्याच्या विशेष कामगिरीबरोबरच देशी वृक्ष लागवडीवर विशेष भर दिला होता. नव्या वर्षात ‘मियावॉकी’ जंगलप्रकार वाढविण्याबरोबरच, पक्षी संमेलन, मॅरेथॉन या कार्यक्रमांची निसर्गप्रेमींना मेजवाणी मिळणार आहे.जिल्ह्यातील जैवविविधता जपण्याबरोबरच सोलापूरचे पक्षी वैभव जगभरातील पक्षीप्रेमींना माहिती व्हावे, यासाठी नव्या वर्षांच्या प्रारंभीच महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

solapur
महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

येत्या वर्षात सर्पमित्र व पर्यावरणप्रेमीसाठी आनंदाची बातमी म्हणजे येथील सिद्धेश्‍वर वनविहार येथे वन्य प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांच्यासाठी ट्रान्झिट उपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे. विशेषत: पक्षीप्रेमी व सर्पमित्रांसाठी हे ‘गिफ्ट’ असेल. मागील अनेक दिवसांपासून शहरातील सर्पमित्र व पक्षीप्रेमी जखमी वन्यजीवांवर उपचार करणे जोखमीचे होते. यापुढे आशा जखमी प्राणी आणि पक्ष्यांच्या बचाव आणि उपचार प्रक्रियची या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये सोय होणार आहे.

solapur
पुणे : कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण

सिद्धेश्‍वर वनविहारात सात किलोमीटरच्या नैसर्गिक पायवाटा तयार करण्यात येणार असून या पायावाटांवरून निसर्गाचा आनंद घेण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. यापूर्वी आझादी का अमृतमहोत्सवनिमित्त मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार आहेत. मागील वर्षी वनविभागाने सुमारे ५५ हेक्‍टर वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले आहे. ही अतिक्रमण हटाव मोहीम वर्षभर सुरू राहणार असून ठिकठिकाणच्या वनजमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. आगामी काळात ग्रामीण भागातील गायरान जमिनी, वनजमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यावर लक्ष केंद्रीत करणत येणार आहे. वन विभागाच्या जमिनीवर मियावाकी जंगले जोपासण्यावर भर दिला जाणार आहे.(Solapur news)

solapur
शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढत आहे. गवा, निलगाय, उदमांजर यासह अनेक दुर्मिळ वन्यप्राणी आपले अस्तित्व सिद्ध करत आहेत. त्याच्या रक्षणासाठी व मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषत: करमाळा आणि माढा तालुक्‍यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कार्यशाळेचे नियोजन करण्यात येणार आहे.

ठळक बाबी

  • सिद्धेश्‍वर वनविहारात पायवाटा

  • वन्यजीवांसाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर

  • अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार

  • मॅरेथॉनचे आयोजन

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन होणार आहे. सिद्धेश्‍वर वनविहारात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात येणार आहे तसेच येथे नैसर्गिक पायवाटा तयार करण्यात येतील. वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू राहणार आहे.

- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com