Sushilkumar Shinde : सुशिलकुमार शिंदेचे डिलिमिटेशनला समर्थन?; त्यामुळे डिलिमिटेशन होणे गरजेचे, काय म्हणाल शिंदे

Sushilkumar Shinde on Delimitation : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भूमिका मांडली आहे. डिलिमिटेशन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
Sushilkumar Shinde on Delimitation

Sushilkumar Shinde on Delimitation

esakal

Updated on: 

Sushilkumar Shinde Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका विरोधाची असली, तरी डिलिमिटेशन झाले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे, अशी स्पष्ट भूमिका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. मात्र, केंद्र सरकारने डिलिमिटेशन विधेयक आणण्याची पद्धत चुकीची असून, सर्व पक्षांना विश्वासात घेऊन आणि सर्वसंमतीने हा निर्णय झाला असता तर अधिक योग्य ठरले असते, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...