एसटी जाळपोळप्रकरणी चौघांना अटक : बार्शी-सोलापूर रस्त्यावरील पानगाव येथील घटना 

एसटी जाळपोळप्रकरणी चौघांना अटक : बार्शी-सोलापूर रस्त्यावरील पानगाव येथील घटना 

बार्शी(सोलापूर): बार्शी-सोलापूर रस्त्यावरील पानगावपासून तीन किलोमीटर अंतरावर झोटींग बाबा मंदिर कमानीजवळ सोलापूर-बार्शी बस थांबवून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक करुन बार्शी न्यायालयात उभे केले असता 27 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एम. एस. सबनीस यांनी दिले. 

सतीष श्रीमंत आरगडे (वय 42, रा. उपळाई रोड, बार्शी), संजय विलास आरगडे (वय 26, रा. तावडी, ता. बार्शी), दत्ता नागनाथ दळवी (वय 21, रा. फपाळवाडी, ता.बार्शी), ऋषीकेश एकनाथ आवटे (वय 18, रा. जामगाव आ.) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. बसचालक रामचंद्र पवार (बार्शी आगार) यांनी फिर्याद दाखल केली. 

ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान घडली होती. सोलापूर-बार्शी ही एमएच 14/बीटी 0503 बस घेऊन बार्शीकडे येत असताना वाहक हनुमंत बुरगुटे यांच्यासह 40 प्रवासी होते. वरील चौघांनी बससमोर अचानक येऊन बस थांबवली. जय श्रीराम, मंदिर उघडलेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत विश्वहिंदू परिषद सोलापूर जिल्हा, मंदिर उघडलेच पाहिजे असा फलक बससमोर काचेच्या खाली बांधला. बसचे पुढील चाक व मागील एका चाकावर बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल टाकले व टेंभ्याने चाके पेटवली व ते झेंडे लावून पळून गेले. यावेळी सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले होते, असे फिर्यादित म्हटले आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधिक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. बसला बॅनर लावला होता. त्यावरुन बार्शीत जेथे बॅनर बनवला तेथे पोलिसांनी चौकशी करताच चार जणांची माहिती समजली. चौघांना पोलिसांनी रातोरात अटक केली असून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने निरीक्षक जायपत्रे यांनी सांगितले. शासकीय कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com