

Solapur Crime
टेंभुर्णी: माढा तालुक्यातील उपळवाटे येथे एकास शेतातील कामाच्या कारणावरून जातिवाचक बोलून व शिवीगाळ केली. तसेच चाबकाने व झाडाच्या फांदीने वेळोवेळी जबर मारहाण केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अनुसूचितजाती प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.