म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी त्यांनी 24 तासात जमवले लाखो रुपये

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी त्यांनी 24 तासात जमवले लाखो रुपये
Summary

सोलापुरातील 'दयानंद मुलांचे वसतीगृह' हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. कारण की, कोरोनाबाधित व‌ नंतर म्युकरमायकोसिसच्या विळख्यात सापडलेल्या मित्राच्या उपचारासाठी अवघ्या 24 तासात 2 लाख रुपये जमा करुन या मित्रांनी मैत्रीचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आपले मित्र आपल्या संपर्कात कायमस्वरूपी राहावेत. या उद्देशाने अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवरती शाळेतील कॉलेजमधील मित्रमंडळींचे ग्रुप केलेले दिसून येतात. परंतु या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फक्त इकडचे तिकडचे मेसेज फॉरवर्ड करणे, एकमेकांच्या टिंगल करणे अन् वायफळ चर्चा या व्यतिरिक्त काहीही साध्य होताना दिसत नाही. परंतु अशा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ना अपवाद काही सामाजिक बांधिलकी जपणारे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ही असतात. (Friends in college have raised millions of rupees for a friend with mucormycosis)

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी त्यांनी 24 तासात जमवले लाखो रुपये
सिध्देवाडीत तरुणाची आत्महत्या; अद्यापही कारण अस्पष्ट

याचे ताजे उदाहरण म्हणजे सोलापुरातील 'दयानंद मुलांचे वसतीगृह' हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. कारण की, कोरोनाबाधित व‌ नंतर म्युकरमायकोसिसच्या विळख्यात सापडलेल्या मित्राच्या उपचारासाठी अवघ्या 24 तासात 2 लाख रुपये जमा करुन या मित्रांनी मैत्रीचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी त्यांनी 24 तासात जमवले लाखो रुपये
महूद-पंढरपूर रोडवर पकडला 63.61 लाखांचा गांजा

सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयातील 2000 ते 2005 या कालावधीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी सध्या नोकरीच्या कारणाने देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहेत. परंतु व्हॉट्सअ‍ॅप वरील ग्रुपच्या माध्यमातून हे सर्व मित्र पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे दरवर्षी गेट टुगेदर, असे अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने ते एकत्र येतात. परंतु गेली वर्षभरापासून कोरोना या महामारीमुळे एकमेकांच्या भेटीगाठी होत नसून, फक्त व्हॉट्सअ‍ॅप मेसेज च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. परंतु मित्रांच्याप्रती असलेले त्यांचे प्रेम किंचीतही कमी झाले नाही. याची प्रचिती या ग्रुपने जपलेल्या सामाजिक बांधिलकीतून दिसून येत आहे.

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी त्यांनी 24 तासात जमवले लाखो रुपये
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे निकष बदला : शेतकऱ्यांची मागणी

सध्या कोरोनाने रक्ताची नाती देखील कमकुवत झाल्याची अनेक उदाहरणे मागील दीड वर्षांत समोर आली आहेत. आपल्यांना दूर करणारा हा कोरोना संपत नाही, तोच म्युकरमायकोसिसचा विळखा वाढत चालला असून त्याच्या उपचाराचा खर्चही मोठा आहे. या दुर्धर व खर्चिक आजाराच्या विळख्याने 'दयानंद मुलांचे वसतीगृह' या ग्रुपमधील कलाकार क्षेत्रात आपले नशीब आजमवत असलेले उमेश अधटराव यांना घेरले असल्याची बातमी मित्रांना समजली. अधटराव यांच्या घरच्या परिस्थितीची जाणीव सर्वांना होती.

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी त्यांनी 24 तासात जमवले लाखो रुपये
'एमपीएससी'च्या परीक्षांचा बदलणार निकाल

त्यामुळे संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र ही जाण ठेवून अधटराव या मित्राच्या मदतीला 'दयानंद मुलांचे वसतीगृह' या ग्रुपमधील मित्र धावून आले असून, अवघ्या 24 तासात दोन लाख दहा हजार रुपये त्यांनी जमा करत उपचारासाठी तातडीने दिले आहेत. यामध्ये शेती करणारे मित्र, कलाकार, उद्योजक, व्यापारी, प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर या सर्वांचा समावेश आहे. विशेष म्हणजे परदेशातून ज्यांना जसे शक्य आहे तशी आर्थिक मदत मित्रांला करत मैत्री कशी असावी, त्याचे उदाहरण सर्वांना दिले आहे.

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी त्यांनी 24 तासात जमवले लाखो रुपये
ग्रामीणमध्ये 36 दिवसांत 1055 मृत्यू! शहरातील परिस्थिती आली आटोक्‍यात

दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा होतो. यावेळी कोण मित्राला गुलाब देतो, तर कोणी मेसेज पाठवितो. मोबाईलचे इनबॉक्स तर फुल्ल झालेले असतात. सोशल मीडियात तर हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. परंतु संकटात सापडलेल्या मित्राला मदत करण्याच्या घटना, मैत्रीचा आधार देवून उभारी देण्याच्या घटना क्वचितच घडतात. त्यातीलच एक, सोलापूर जिल्ह्यातील 'दयानंद मुलांचे वसतीगृह' या व्हॉटसअप ग्रुपच्या सदस्यांनी कोरोनाबाधित मित्राच्या उपचारासाठी अवघ्या 24 तासात लाखो रुपयांची केलेली मदत.

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी त्यांनी 24 तासात जमवले लाखो रुपये
भरधाव ट्रक घुसला हॉटेलात! औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील घटना

दयानंद मुलांचे वस्तीगृह या ग्रुपच्या मुलांची प्रशासनात भरारी

शिवप्रसाद नकाते (आयएएस), सप्निल पाटील (आयआरएस), अभयसिंह मोहिते (उपजिल्हाधिकारी), डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी), रत्नाकर नवले (पोलीस उपअधीक्षक), प्रदिप उबाळे (तहसिलदार), शीतलकुमार कोल्हाळ (सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांच्यासह अनेकजण उद्योग, अभियांत्रिकी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.

(Friends in college have raised millions of rupees for a friend with mucormycosis)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com