तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्नशील : गजानन गुरव

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्नशील : गजानन गुरव
तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्नशील : गजानन गुरव
तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्नशील : गजानन गुरवSakal
Summary

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या अनुषंगाने पुरातत्त्व विभागाने सुमारे 65 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्याला शासनाची परवानगी मिळाल्यानंतर कामे सुरू होणार आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक येतात, हे लक्षात घेऊन मंदिर समितीकडून सामाजिक अंगानेदेखील काही कामे झाली पाहिजेत, असे मला वाटते. त्या दृष्टीने येथे येणाऱ्या भाविकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या (Vitthal- Rukmini Mandir Samiti, Pandharpur) माध्यमातून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभा करता येणे शक्‍य आहे. प्रलंबित उड्डाणपूल आणि नवीन दर्शन मंडप बांधून दर्शन रांग आणखी सुलभ करता येईल. नदीच्या पैलतीरातील 65 एकरामधून भाविकांना नियोजित दर्शन मंडपाच्या ठिकाणी येता यावे यासाठी नदीवर आणखी एक पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल झाल्यास शहरातील गर्दी आणि वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे हा पूल लवकर व्हावा यासाठी पाठपुरावा करणार आहे. पंढरपुरात आल्यानंतर भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन लगेच परत न जाता किमान एक-दोन दिवस पंढरपुरात राहावे, यादृष्टीने काय काय करता येईल याचा विचार करून जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत, असे मत पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav) यांनी व्यक्त केले. 'कॉफी विथ सकाळ'मध्ये (Coffee With Sakal) ते बोलत होते.

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्नशील : गजानन गुरव
चिक्की, राजगिरा लाडूतून बार्शीतील दाम्पत्याची कोट्यवधींची उलाढाल!

बाजारपेठेतील उलाढाल वाढेल

पंढरपूरकडे येणाऱ्या बहुतांश रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि सुलभ प्रवास करून पंढरपूरला येणे शक्‍य होणार आहे. साहजिकच पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. एक प्रकारे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. परंतु पंढरपूरला आलेले भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन लगेच परत जातात. त्याऐवजी आलेले भाविक किमान एक- दोन दिवस पंढरपुरात मुक्कामी राहिले पाहिजेत; जेणेकरून पंढरपूरमधील बाजारपेठतील उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल.

संग्राह्य पुस्तिका

पंढरपूर आणि लगतच्या तालुक्‍यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन मंदिरे आहेत. पंढरपूरला आलेल्या भाविकांना त्या मंदिरांविषयी फारशी माहिती नसते. या मंदिरांची छायाचित्रे आणि माहिती असलेली संग्राह्य पुस्तिका भाविकांना उपलब्ध करून दिली तर भाविक ही मंदिरे पाहण्यासाठी आवर्जून जातील आणि त्यानिमित्ताने एक-दोन दिवस पंढरपुरात राहतील. त्याचा फायदा पंढरपुरातील उलाढाल वाढण्यास नक्की होईल.

कम्युनिटी रेडिओ स्टेशन

31 ऑक्‍टोबर रोजी मंदिर समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कम्युनिटी रेडिओ स्टेशनसंदर्भात चर्चा होणार आहे. कम्युनिटी रेडिओ स्टेशनच्या आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबरच अन्य सूचना, माहिती देण्यासाठी अत्यंत चांगला उपयोग होऊ शकतो. हे लक्षात घेऊन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि अन्य सदस्यांशी चर्चा करुन या बैठकीत निर्णय होईल असे वाटते.

65 कोटींचा आराखडा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या अनुषंगाने पुरातत्त्व विभागाने सुमारे 65 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्याला शासनाची परवानगी मिळाल्यानंतर कामे सुरू होणार आहेत. शहरातील परिवार देवतांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार दानशूर व्यक्तींकडून देणगी मिळवून करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वारकऱ्यांना स्नानासाठी चंद्रभागा नदीत कायमस्वरूपी पाणी असावे यासाठी काही वर्षांपूर्वी श्री विष्णुपद मंदिराच्या पुढे समितीच्या माध्यमातून बंधारा बांधण्यात आला. प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंट स्वच्छ करण्याचे कामदेखील समितीच्या माध्यमातून केले जात होते. मंदिर समितीने स्वच्छतेचे काम थांबवले आहे. घाट सुशोभीकरणाचे कामही रेंगाळले आहे. त्याला गती देण्याच्या दृष्टीने आपण पाठपुरावा करू, असे श्री. गुरव यांनी नमूद केले.

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्नशील : गजानन गुरव
"सोपानकाका देहूकर ‌पुरस्कार हा मुक्ताई फडावरील वारकऱ्यांचा सन्मान"

संत विद्यापीठ

मध्यंतरी भक्ती मार्गावरील "एमटीडीसी'च्या जागेवर संत विद्यापीठ उभारण्याचा विचार झाला होता. परंतु ती जागा कमी आहे. त्याऐवजी पंढरपूर तालुक्‍यात काही ठिकाणी समितीची मोठी जागा आहे. त्या जागेवर भव्य आणि सुसज्ज संत विद्यापीठाची उभारणी होऊ शकेल असे श्री. गुरव यांनी नमूद केले.

'कोविड'च्या उपाययोजना

"कोविड'च्या कारणाने सुमारे दीड वर्ष मंदिर भाविकांसाठी बंद होते. आता मंदिर भाविकांना मुख दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने गर्दी वाढली आहे. तथापि कोरोनाच्या अनुषंगाने आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शासनाच्या सूचनेप्रमाणे सध्या मुखदर्शनाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर पदस्पर्श दर्शन व्यवस्था पूर्ववत होईल असा विश्वास श्री. गुरव यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com