
सोलापूर: श्री गणेशोत्सव हा शहराचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून तयारी पूर्ण करावी. यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडेल, याची दक्षता घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मिरवणूक मार्ग व विसर्जन कुंडाच्या पाहणीदरम्यान दिले. तसेच शहरात ११ विसर्जन कुंड अन् ६९ मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.