
सोलापूर: भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला म्हणजेच बुधवारी (ता. २७) श्री लाडक्या बाप्पाचे घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये आगमन होत आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पुढील दहा दिवस चालणाऱ्या आनंदपर्वास आजपासून सुरुवात होणार आहे. भक्तांमध्ये आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे.