Ganpati Visarjan 2023 : हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांकडून गणेशाची आरती !

Ganpati visarjan 2023 : सिद्धिविनायक मित्र मंडळाचा ऐक्याचा उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक.
Ganpati Visarjan 2023
Ganpati Visarjan 2023 sakal

येथील सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने मुस्लिम बांधवांचे पवित्र असणारे सौदी अरब येथील मक्का यात्रेसाठी (हज) येथे जाणाऱ्या पाच मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती ची महा आरती करुन त्यांना सन्मानित केले व हज यात्रेसाठी शुभेच्छा देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे.

कुर्डू ता माढा जिल्हा सोलापूर येथील मशीदी चे जनाब-जमिल कांद्री ,महमूद मौला तांबोळी, मेहबूब दगडू तांबोळी , बेगम मेहबूब तांबोळी ,आयशा रमजान तांबोळी यांचा मानसन्मान करून व त्यांच्या हस्ते आरती त्यांचा आदर्श सत्कार करण्यात आला.

Ganpati Visarjan 2023
Pune Ganpati Visarjan 2023 : १० हजार कर्मचारी; अनंत चतुर्दशी दिनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिका सज्ज

सिद्धिविनायक मित्र मंडळ हे गेले 25वर्षांपासून सर्व धर्म समभाव मानुन गणपती ची प्रतिष्ठापना करीत आहे . सर्व गणेश भक्तांच्या मदतीने गणपतीचे मंदिराचे बांधकाम केले आहे व नेहमीच मंडळाचे सर्व पदाधिकारी स्तुत्य उपक्रम राबवत असतात.

मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोलार ,उपाध्यक्ष जीवन कापरे, सदस्य अभिजीत संचेती, नीलकंठ लंगोटे, अर्जुन वरपे, पिंटू वरपे ,फिरोज शेख, ताजुद्दीन शेख, सोपान दळवी, राहुल मुकरे चंद्रकांत शिंदे, फिरोज तांबोळी,यासीन तांबोळी व मंदिराचे पुजारी गणेश गुरव व मुस्लिम बांधव, गावातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ganpati Visarjan 2023
Ganpati Visarjan 2023 : गणेश विसर्जन करून येणाऱ्या ॲपेला ट्रॅकची धडक; अपघातात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com