जिल्हाधिकाऱ्यांच्या 'शिवदर्शन'ने अनुभवली ऐतिहासिक मैफल!

जिल्हाधिकाऱ्यांच्या 'शिवदर्शन'ने अनुभवली ऐतिहासिक मैफल!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 'शिवदर्शन'ने अनुभवली ऐतिहासिक मैफल!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 'शिवदर्शन'ने अनुभवली ऐतिहासिक मैफल!
Summary

सोलापूर महसूल विभागातील 1993-95 वर्षातील अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला.

सोलापूर : महाराष्ट्राचे (Maharashtra) आणि दिल्लीचे (Delhi) प्रशासन गाजविलेले, गाजविणारे अनेक दिग्गज अधिकारी तब्बल 28 वर्षांनंतर एकत्रित आले होते. सोलापुरात अनेक अधिकारी आले आणि बदलून गेले. जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector's Office) कर्मचारी मात्र तेच राहिले, जे कर्मचारी निवृत्त झाले होते त्यातील काही जण जुन्या साहेबांना भेटण्यासाठी नव्या साहेबांच्या बंगल्यावर आले होते. सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी दिनेश कुमार जैन (Dinesh Kumar Jain) यांच्या काळात महसूल प्रशासनात (Revenue Administration) कार्यरत असलेले अधिकारी तब्बल 28 वर्षांनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या शिवदर्शन बंगल्यावर एकवटले होते. (Get together was celebrated at the Collector's residence of former officers of the Revenue Department)

जिल्हाधिकाऱ्यांचा शिवदर्शन बंगला सोलापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातील अधिकाऱ्यांच्या गेट टुगेदरचा साक्षीदार झाला. शनिवारची सायंकाळ उलटून गेल्यानंतरची वेळ... जिल्हाधिकारी बंगल्यावर सुरू असलेली धावपळ... कानी समधुर धून... जो तो आपापल्या परीने जबाबदारी पार पाडण्याच्या नादात... निमित्त होते सोलापुरातील 1993 मध्ये महसूल प्रशासनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या स्नेहमिलनाचे... तत्कालीन जिल्हाधिकारी व लोकपालचे विद्यमान सदस्य दिनेश कुमार जैन यांच्या स्वागताच्या तयारीत होती साऱ्यांचीच धावपळ..! त्यांच्या आगमनानंतर अन्‌ हलक्‍याफुलक्‍या संवादानंतर वातावरण एकदम फुलून गेले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या 'शिवदर्शन'ने अनुभवली ऐतिहासिक मैफल!
महाविकास आघाडीसाठी कॉम्प्रमॉईज करावेच लागेल : सुशीलकुमार शिंदे

'सकाळ'च्या (Sakal) सोलापूर आवृत्तीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास श्री. जैन, तत्कालीन उपजिल्हाधिकारी व विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री. जैन हे एकदा तरी सोलापूर जिल्ह्यात यावेत, सर्वांच्या गाठीभेटी व्हाव्यात असे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना नेहमीच वाटत असे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे (Maharashtra Airport Development Authority) अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक नलावडे (Deepak Nalawade) व 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी (Abhay Diwanji) यांच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर श्री. जैन यांच्या सोलापूर भेटीचा योग आला. निमित्त होते... 'सकाळ'च्या वर्धापनदिनाचे... वर्धापनदिन व तत्कालीन अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा त्याचबरोबर कुडलसंगम (Kudalsangam) व पंढरपूर (Pandharpur) दर्शनाची योजना आखण्यात आली. श्री. दिवाणजी तत्कालीन अधिकाऱ्यांच्या स्नेहमिलनाचे महत्त्वाचा दुवा ठरले. या सर्वांमध्ये ते एकमेव 'नॉन ऑफिशियल' होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (Maharashtra Public Service Commission) अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (Kishore Rajenimbalkar) यांच्या सत्काराचे नियोजन झाले. त्या काळात विविध पदांवर कार्यरत असलेले अरुण उन्हाळे (Arun Unhale) (व्यवस्थापकीय संचालक, कापूस पणन महामंडळ), अशोक काकडे (Ashok Kakade) (मुख्य कार्यकारी अधिकारी, सारथी), चिंतामणी जोशी (Chintamani Joshi) (संचालक, भूजल सर्वेक्षण), श्री. नलावडे (अतिरिक्त जिल्हाधिकारी), तानाजी शिंदे (Tanaji Shinde) (निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी), तुकाराम पवार (Tukaram Pawar) (निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी), 'यशदा'चे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (Dr. Mallinath Kalashetti) या सर्वांनी हजेरी लावली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या 'शिवदर्शन'ने अनुभवली ऐतिहासिक मैफल!
वयोमर्यादा संपलेल्यांची निराशा! राज्यसेवेसाठी अर्जाची संधी हुकली

एखाद्या महाविद्यालयात किंवा शाळेतील एका बॅचचा स्नेहमेळावा होत असतो, परंतु एखाद्या वर्षी त्या काळातील अधिकारी पुन्हा तब्बल 28 वर्षांनंतर पूर्वीच्या ठिकाणी एकत्र येण्याचा योग म्हणजे ऐतिहासिकच प्रसंग झाल्याची भावना श्री. जैन यांनी व्यक्त केली. सोलापुरात असा ऐतिहासिक स्नेहमेळावा झाल्याबद्दल श्री. जैन भावनिक झाले. सोलापूरच्या महसूल प्रशासनात काम करताना त्यावेळी घडलेल्या किश्‍श्‍यांचा उलगडा होत होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनाचे बॉस म्हणून असलेल्या जैन साहेबांपुढे आज प्रत्येक जण मनमोकळेपणाने बोलत होता. बॅचलर गॅंग, जुन्या गमतीजमती, महसूल प्रशासनातील अनुभवी अधिकाऱ्यांची किमया यातील अनेक किश्‍श्‍यांतून उडालेले हास्याचे फवारे उपस्थितांना अनुभवास आले. याप्रसंगी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर (P. Shivshankar), पोलिस आयुक्त हरीश बैजल (Harish Baijal), उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर (Vaishali Kadukar), दीपाली धाटे (Deepali Dhate), एसआरपीचे विजय चव्हाण (Vijay Chavan), अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव (Sanjiv Jadhav), उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील (Dhairyashil Patil), निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार (Shama Pawar), उपजिल्हाधिकारी हेमंत निकम (Hemant Nikam), भारत वाघमारे, वर्षा लांडगे, तहसीलदार अमोल कुंभार व जयवंत पाटील आदी स्थानिक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सहकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक

जिल्हाधिकारी निवासस्थानात तब्बल 28 वर्षांनंतर दिलेल्या भेटीप्रसंगी श्री. जैन यांनी गतस्मृतींना उजाळा दिला. निवासस्थानातील प्रत्येक खोलीची व परिसराची पाहणी केली. नव्याने काय-काय बदल झाले हे पाहिले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी संपूर्ण बंगला दाखवत माहिती दिली. त्यावेळी झालेल्या भूकंपात प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल श्री. जैन यांनी तोंडभरून कौतुक केले. संपूर्ण 24 तासात केवळ तीन तास अँटी चेंबरमध्ये शक्‍य झाले तर वामकुक्षी होत असल्याचा अनुभव सांगितला. तत्कालीन पीए, कर्मचारी, चालक, शिपायांच्या नावांसह आठवणी निघाल्या. अनेक गंभीर चर्चा, मनमोकळ्या संवादाने वातावरण फुलून गेले होते. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी स्नेहमेळाव्यास आलेल्या श्री. जैन व सहकाऱ्यांचा विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन सन्मान केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या 'शिवदर्शन'ने अनुभवली ऐतिहासिक मैफल!
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेपूर्वी लसीकरण?

सोलापुरी जेवणाचा अस्वाद

लोकपाल सदस्य जैन यांनी या दौऱ्यात कुडल संगम (ता. दक्षिण सोलापूर) येथे भेट दिली व पंढरपूरला विठ्ठल- रुक्‍मिणीचे दर्शन घेतले. 'सकाळ'च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी निवासस्थानात आयोजित स्नेहमेळाव्यास उपस्थिती लावली. येथे आयोजित स्नेहभोजनात त्यांनी सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेतला. गव्हाची खीर (हुग्गी) त्यांनी आवडीने खाल्ली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com