
सोलापूर : जिल्ह्यातील ९७ आश्रमशाळांपैकी बहुतांश शाळा बोगस आहेत. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकच संस्थापक आणि सर्व कुटुंबीय कर्मचारी आहेत. विद्यार्थ्यांच्या नावाने येणारे अनुदान लाटण्याचे ‘पाप’ आश्रमशाळांमध्ये सुरू असून या पापाचे वाटेकरी सर्व संबंधित अधिकारी आहेत. आश्रमशाळांच्या कारभारात सुधारणा न झाल्यास तीन महिन्यात प्रशासक नेमण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.