MLA Gopichand Padalkar
sakal
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एनडीए प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सावध भूमिका घेतली. ‘या चर्चा मी केवळ माध्यमांतून ऐकल्या आहेत. राष्ट्रवादी आमच्यासोबत येणार की नाही, याचा निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील. हा संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय असून, याबाबत मला अधिक माहिती नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.