Grampanchyat Election Result : मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत 27, तर दावे 70

मंगळवेढा - तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी शासकीय गोदामात पार पडली. निकालानंतर विजयी सरपंच आणि सदस्यांनी गुलालाची व फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
Grampanchyat Election Result
Grampanchyat Election Resultsakal

मंगळवेढा - तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी शासकीय गोदामात पार पडली. निकालानंतर विजयी सरपंच आणि सदस्यांनी गुलालाची व फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. मात्र, निकालानंतर तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी या ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असल्याचा दावा केला. दरम्यान निंबोणी ग्रामपंचायतीमध्ये बिरूदेव घोगरे हे तालुक्यात सर्वाधिक 906 मतांनी विजयी झाले.

या ग्रामपंचायतीसाठी काल तालुक्यात 81.48% इतके मतदान झाले. 52 हजार 310 पैकी 42 हजार 620 मतदारानी मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळी आठ वाजता तहसीलदार मदन जाधव यांनी अतिशय नियोजनबद्ध सात फेऱ्यात मतमोजणी घेतली.

आंधळगाव येथे अंकुश डांगे व वर्षा डांगे यांना 286 इतकी तर अकोला येथे अमोल सरवदे व रवींद्र शिरसागर यांना 203 इतकी समान मते पडल्यावर चिठ्ठीवर आंधळगाव येथे अंकुश डांगे तर अकोला येथे अमोल सरवदे यांना विजय घोषित करण्यात आले. निकालानंतर उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष केला. पोलीस निरीक्षक रणजीत माने हे उल्लडबाजी करू नका. केल्यास तुमची दिवाळी जेलमध्ये जाईल असा इशारा देत होते.

मतमोजणीनंतर फेरीवाईज उमेदवार व समर्थक बाहेर काढले जात होते. हिवरगाव येथे सरपंच व सहा सदस्य बिनविरोध निवडले गेले होते. एका जागेसाठी झालेल्या मतदानामध्ये बलभीम नागणे हे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील गटाचे विजयी झाले. निंबोणी येथे सरपंचपदाचे बिरूदेव घोगरे हे सर्वाधिक मताने 906 विजयी तर शेलेवाडी येथील सुनिता माळी या तीन मतांनी विजयी झाल्या.

शिरसी येथे सरपंच पदासाठी उभे असलेले दामाजीचे संचालक तानाजी कांबळे यांचा पराभव झाला तर या ठिकाणी जयश्री गायकवाड या एका मताने विजयी झाल्या. तर नंदूर येथे परमेश्वर येणपे,आणि चनबसू येणपे हे दोघे बंधू सदस्यपदी विजयी झाले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आ. समाधान आवताडे गटाने 20, तर भगीरथ भालके यांनी 7, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाने 13 , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्या गटाने 15 व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या गटाने 4,राष्ट्रवादीचे अभिजीत पाटील यांच्या गटाने 13 या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला.

विजयी उमेदवारांनी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यालयात हजेरी लावत आम्ही तुमचेच आहे असे म्हणत सत्कार स्वीकारले. त्यामुळे मतमोजणीनंतर लोणार येथे विजयानंतर जल्लोष करताना दोन गटात वादावादी होऊन त्याचे पर्यावसन भांडणात झाले. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक रणजीत माने हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com