esakal | पालकमंत्र्यांनी बंद खोलीत बैठक घेतली पण...
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्र्यांनी बंद खोलीत बैठक घेतली पण...

शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही पुन्हा बंद खोलीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली. परंतु मतभेद संपण्याऐवजी प्रमुख पदाधिकारीच हमरीतुमरीवर आले. त्यामुळे श्री.भरणे यांना हस्तक्षेप करुन हमरीतुमरीवर आलेल्या प्रमुख मंडळींना कसेबसे शांत करत बैठक गुंडाळावी लागली.

पालकमंत्र्यांनी बंद खोलीत बैठक घेतली पण...

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पदाधिकाऱ्यांमधील मतभेद संपावेत यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना यश आले नव्हते. शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray bharane) यांनीही पुन्हा बंद खोलीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली. परंतु मतभेद संपण्याऐवजी प्रमुख पदाधिकारीच हमरीतुमरीवर आले. त्यामुळे श्री.भरणे यांना हस्तक्षेप करुन हमरीतुमरीवर आलेल्या प्रमुख मंडळींना कसेबसे शांत करत बैठक गुंडाळावी लागली.(guardian minister dattatray bharane held a meeting in pandhapur)

हेही वाचा: माऊलींच्या चोपदारांची अंतरंगवारी! आळंदी ते पंढरपूर प्रवास

पंढरपूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद तुलनेने अत्यंत मर्यादित आहे. त्यातच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये विविध कारणांवरुन कमालीचे मतभेद आहेत. अशा परिस्थितीत आमदार (कै.) भारत भालके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करुन विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती. त्यामुळे शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढली होती. परंतु भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील मतभेद उफाळून आले आहेत.

हेही वाचा: पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी करणार प्रयत्न

विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी माजी आमदार (कै.) औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी (कै.) भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांची निवड करण्यास आणि त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मतभेद संपवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना यश आले नव्हते.

हेही वाचा: पंढरपूर मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते भाविकांच्या प्रतिक्षेत!

पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना (कै.) भारत भालके यांच्या जनसंपर्कामुळे लक्षणीय मते मिळवली. परंतु पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्यात त्यांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असला की पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील मतभेद दिसून येतात. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढे देखील मतभेदाचे प्रदर्शन होते.

हेही वाचा: आशादायक ! पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे झाली कोरोनामुक्त

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री श्री.भरणे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहातील बंद कक्षात बैठक घेतली. या बैठकीस श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीऱथ भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, अॅड.गणेश पाटील, अॅड. दिपक पवार, सुधीर भोसले, श्रीकांत शिंदे, संदिप मांडवे, संतोष सुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये राबवणार पंढरपूर-मंगळवेढा पॅटर्न !

या बैठकीच्यावेळी अन्य कोणी आत येऊ नये यासाठी कक्षा बाहेर पोलिस उभे करण्यात आले होते. या बैठकीत प्रमुख पदाधिकारी तावातावाने बोलून हमरीतुमरीवर आले. बैठकीत मतभेद संपण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर चर्चा सुरु झाल्याने वाद आणखी वाढला. हा प्रकार पाहून पालकमंत्री श्री.भरणे अवाक झाले. मतभेद संपवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पदाधिकारी हमरीतुमरीवर आल्याने त्यांना बैठक अक्षरशः गुंडाळावी लागली.

loading image