esakal | ऑक्‍सिजन निर्मितीबाबत साखर कारखाने सकारात्मक : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

बोलून बातमी शोधा

Guardian minister dattatray bharane

कोरोनावर उपचारासाठी शहर पातळीवर खाजगी रुग्णालय कार्यरत झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक याठिकाणी गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी ज्या गावांची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे, त्या ठिकणी कोरोना उपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे. परिणामी शहरातील गर्दी नियंत्रणात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

ऑक्‍सिजन निर्मितीबाबत साखर कारखाने सकारात्मक : पालकमंत्री भरणे
sakal_logo
By
वसंत कांबळे

कुर्डुवाडी (सोलापूर) : शहरातील गर्दी टाळण्यासाठी पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात त्वरित कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. ऑक्‍सिजन निर्मितीबाबात जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सकारात्मकता दर्शवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुर्डुवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहातील बैठकीत त्यांनी विविध तक्रारीबाबत खुलासा केला व अधिकारी यांना सूचना दिल्या. कोरोनावर उपचारासाठी शहर पातळीवर खाजगी रुग्णालय कार्यरत झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक याठिकाणी गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी ज्या गावांची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे, त्या ठिकणी कोरोना उपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे. परिणामी शहरातील गर्दी नियंत्रणात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

हेही वाचा: ...तर 'या' कारखान्यात बारा दिवसांत सुरु होईल ऑक्सिजन निर्मिती

कुर्डुवाडीत शासकीय अद्यावत कोविड उपचार केंद्र सुरु करण्याबाबत बैठकीत अनेकांनी मागणी केली. यासाठी रेल्वे रुग्णालयाही सामावून घेणे, अशी मते शहरवासियांनी मांडले. त्यास पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच ऑक्‍सिजन निर्मितीबाबत बहुतांशी साखर कारखान्यांनी सकारात्मकता दाखवली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची यात अग्रक्रमाची भूमिका असेल, असे जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, नगराध्यक्ष समिर मुलाणी, प्रांताधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, माढ्याच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, मुख्याधिकारी समीर भुमकर, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सुनंदा रंदवे, शिवसेना नेते संजय कोकाटे, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, बाजार समिती संचालक बंडु भोसले, उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे आदी उपस्थित होते. दरम्यान, पत्रकारांना कोरोना झाल्यास उपचारासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून त्यांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळण्याबाबतचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्यावतीने पालकमंत्री भरणे यांना देण्यात आले.

हेही वाचा: उजनीचा पाणीसाठा आला 20 टक्‍क्‍यांवर

अधिकाऱ्यांनी 24 तास मोबाइल सुरू ठेवावा

कोरोना महामारीतून बाहेर पडण्यासाठी सर्व अधिकार यांनी स्वत:चे मोबाईल 24 तास सुरु ठेवावेत. मोबाईल बंद ठेऊन जबाबदारी नाकारल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी कर्मचारी, अधिकारी यांना पालकमंत्री भरणे यांनी दिला.