शाळा सुरु होणार की बंदच राहणार! पालकमंत्री मंगळवारी घेणार निर्णय

कोरोना वाढत असतानाच दिवसेंदिवस रुग्णांचा आलेखही उंचावू लागला आहे.
Dattatray Bharane
Dattatray Bharaneesakal
Updated on
Summary

कोरोना वाढत असतानाच दिवसेंदिवस रुग्णांचा आलेखही उंचावू लागला आहे.

सोलापूर : कोरोना (Corona) वाढत असतानाच दिवसेंदिवस रुग्णांचा आलेखही उंचावू लागला आहे. अशा परिस्थितीत शाळा (School) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, त्यासंबंधीचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे ढकलला. शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घेताना प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच परीक्षा (Exam) द्यावी लागत आहे. ग्रामीणमधील शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णयावरून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी आता पालकमंत्र्यांकडे बोट केले आहे.

Dattatray Bharane
सोलापूर : हक्काच्या पैशांसाठी मदतीची याचना

जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या सहा हजारांपर्यंत शाळा (शासकीय व खासगी) असून त्यामध्ये जवळपास सहा लाख विद्यार्थी (Students) शिक्षण घेतात. कोरोनामुळे (Corona) मार्च 2020 पासून दोन महिन्यांपर्यंत कधीच सलग शाळा सुरू राहिल्या नाहीत. पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांचीच तर शाळा काही दिवसांसाठीच उघडली. त्या मुलांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम झाला असून आता बोर्डाच्या परीक्षेपूर्वी दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे खासगी कोचिंग क्‍लासेस सुरू करण्याची गरज असतानाही ते बंदच आहेत. त्यांनाही परीक्षेतील चांगल्या टक्‍केवारीची चिंता सतावू लागली आहे. लहान मुलांच्या सवयीत बदल झाला असून त्यांना अनेक विकार होऊ लागल्याचीही स्थिती आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील विशेषत: कोरोनामुक्‍त, कोरोनाचे रुग्ण खूपच कमी असलेल्या गावातील शाळा नियमांचे पालन करून सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासंबंधीचा निर्णय पालकमंत्री भरणे हे मंगळवारी घेतील. प्रजासत्ताक दिनानिमित्त ते सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांच्या स्थितीचा आढावा घेऊनच त्यासंबंधीचा निर्णय होऊ शकतो, असेही ते म्हणाले. या बैठकीत शहरातील शाळांबाबतीतसुध्दा निर्णय होऊ शकतो.

Dattatray Bharane
सोलापूर महापालिकेने मुदत संपलेल्या ९५ जागांचा घेतला ताबा

जिल्ह्यातील शाळांची स्थिती

- प्राथमिक शाळा- 4997

- एकूण प्रवेशित विद्यार्थी- 3,92,431

- माध्यमिक शाळा- 1087

- एकूण विद्यार्थी- 2.63 लाख

ग्रामीण भागातील मुलांची गुणवत्ता राखण्यासाठी पालकांच्या मतांनुसार सर्वच शाळा सुरू करण्यासंबंधीचा सकारात्मक प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविला आहे. मंगळवारी (ता. 25) पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल.

- दिलीप स्वामी, सीईओ, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com