esakal | Solapur : पोलिस आयुक्‍तपदी बैजल! जाणून घ्या त्यांची आतापर्यंतची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस आयुक्‍तपदी बैजल

शहर पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी आता सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांना संधी मिळाली आहे.

पोलिस आयुक्‍तपदी बैजल! जाणून घ्या त्यांची आतापर्यंतची कामगिरी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर पोलिस आयुक्‍त (Police Commissioner) अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांची पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी आता सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल (Harish Baijal) यांना संधी मिळाली आहे. त्यांनी सोमवारी आयुक्‍तपदाचा पदभार स्वीकारला. मूळचे जालन्याचे (Jalna) असलेले बैजल यांनी 1993 मध्ये पोलिस दल जॉईन केले. मुर्तुजापूर (जि. अकोला) या ठिकाणी त्यांची पहिली पोस्टिंग पोलिस उपअधीक्षक म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी पांढरकवडा (जि. यवतमाळ), रायगड, औरंगाबाद या ठिकाणी काम केले.

हेही वाचा: तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदेंचा 'हा' विचार सर्वांनाच भावला

संयुक्‍त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेतही त्यांना एक वर्ष कोसोव्वा येथे काम करण्याची संधी मिळाली. तिथून आल्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली आणि मुंबईतील वाहतूक शाखेचे ते पोलिस उपायुक्‍त झाले. त्या ठिकाणी काम करताना त्यांनी प्रथमच मुंबईत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. "नो हॉर्न डे' हा उपक्रम राबविला. 2008 नंतर त्यांना पदोन्नती मिळाली आणि नाशिकमध्ये लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे ते पोलिस अधीक्षक झाले. नाशिक येथील पोलिस अकॅडमीतही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी अन्न व औषध विभागाचे (एफडीए) सहआयुक्‍त म्हणून काम केले.

सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीतील इफेड्रिन प्रकरणात त्यांनी मोठी कारवाई केली होती. त्यांनी राज्य मानवाधिकार आयोगातही काम केले. त्यानंतर त्यांची बदली गोंदियाचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली. तेथून पदोन्नतीवर त्यांची बदली झाली अन्‌ मुंबईत सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षकपदी काम करण्याची संधी मिळाली. आता ते सोलापूर पोलिस आयुक्‍त म्हणून रुजू झाले आहेत.

हेही वाचा: जाता जाता पोलिस आयुक्‍तांचा दंगा नियंत्रण पथकाला दणका!

शहराचा होईल नावलौकिक

राज्यभरात विविध पदांवर काम करताना खूप अनुभव आले आहेत. आता सायबर गुन्हेगारी खूप वाढू लागली आहे. सर्वसामान्य सुरक्षित राहतील, गुन्हेगारांची भीती त्यांच्या मनात राहणार नाही. पोलिस अधिकारी, अंमलदारांचे बळ वाढेल, यादृष्टीने प्रयत्न राहील. सर्वांना सोबत घेऊन शहराचा नावलौकिक होईल, असे काम करण्याचा मानस नवे पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला.

loading image
go to top