esakal | Solapur : जाता जाता पोलिस आयुक्‍तांचा दणका! दंगा नियंत्रण पथकातील आठजणांची रोखली वेतनवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस आयुक्‍तांचा दंगा नियंत्रण पथकाला दणका!

दंगा नियंत्रण पथकातील आठ पोलिस कर्मचाऱ्यांना दोन वर्षे तुमची वेतनवाढ का रोखली जाऊ नये, अशी नोटीस बजावून आयुक्त शिंदे यांनी जाता जाता कारवाईचा दणका दिला.

जाता जाता पोलिस आयुक्‍तांचा दंगा नियंत्रण पथकाला दणका!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लखीमपूर (उत्तर प्रदेश) (Kakhimpur, Uttar Pradesh) येथील शेतकरी हिंसाचार प्रकरणी सोमवारी महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारण्यात आला होता. त्याअनुषंगाने शहरात काही अनुचित प्रकार होऊ नयेत म्हणून सर्व पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा नियंत्रण पथकाला अलर्ट राहण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी दिले होते. तरीही, सोमवारी दंगा नियंत्रण पथकाच्या वाहनात साहित्य ठेवून स्वत:च्या दुचाकीवरून येणाऱ्या आठ पोलिस (Police) कर्मचाऱ्यांना दोन वर्षे तुमची वेतनवाढ का रोखली जाऊ नये, अशी नोटीस बजावून शिंदे यांनी जाता जाता कारवाईचा दणका दिला.

हेही वाचा: तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदेंचा 'हा' विचार सर्वांनाच भावला

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपच्या योगी सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीसह मित्रपक्षांतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यामध्ये महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. शहरातील मुख्य बाजारपेठांसह कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी काहीतरी घडण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात आली होती. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. संबंधित विभागाच्या पोलिस निरीक्षकांनी त्या पथकातील कर्मचाऱ्यांची माहिती घेतली, त्या वेळी त्यांच्या वाहनात काहीजण नसल्याचे समजले. त्यांनी तत्काळ कंट्रोलला कळवून त्याची माहिती दिली. तो संदेश पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी ऐकला आणि तत्काळ ऍक्‍शन घेतली. त्या आठ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांच्यावरील पुढील कारवाई पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा: पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

शहरात 150 जणांविरुद्ध कारवाई

महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या 100 जणांना पोलिसांनी पकडून पोलिस ठाण्याला आणले. त्या ठिकाणी त्यांना नोटीस बजावून सोडले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांसह मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदविला. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगरसेवक चेतन नरोटे, लक्ष्मीनारायण दासरी यांच्यासह 32 जणांविरुद्ध तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंद्रकांत उत्तम दीक्षित यांच्यासह दहाजणांविरुद्ध, सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह 22 जणांविरुद्ध, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कॉंग्रेसचे अंबादास करगुळे यांच्यासह 14 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भीमाशंकर मंजेली, युसूफ म. हनिफ शेख, अनिल वासम यांच्यासह 12 जणांविरुद्ध कारवाई झाली.

loading image
go to top