वैज्ञानिक दृष्टीकोनातून एक हजार तुळशी रोपांचे ते करत आहेत संगोपन

tulas zad.jpg
tulas zad.jpg
Updated on

सोलापूर: केवळ अंधश्रद्धा बाळगून झाडांची जोपासना करण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुळशीच्या विविध प्रकारांच्या एक हजार रोपांचे संगोपन करण्याचे काम येथील नामदेव नगरातील अरुण होमकर यांनी केले आहे. 

होमकर हे व्यवसायाने व्यापारी असले तरी लहानपणापासून त्यांनी बागकामाची आवड जपली आहे. बाहेरगावी गेल्यानंतर तुळशीचे दुर्मिळ प्रकार शोधून आणून त्याची लागवड ते करतात. तुळस आपल्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे घरासमोर एखादी तुळस असावी एवढेच महत्व दिले गेले आहे. अरुण होमकरांनी मात्र प्रत्यक्षात त्यांच्या घराची बाग तुळशीची केली आहे. त्यांनी अनेक तुळशीची रोपे लावली आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारपणे पंढरपुरी, गादी व कृष्ण तुळस हे प्रकार सापडतात. त्यांनी म्हैसूर येथून सुगंधी तुळस आणली. दक्षिण भारतात रामेश्वर परिसरात त्यांना पुदिन्याप्रमाणे सुगंध देणारी तुळस मिळाली. महाराष्ट्र व राज्याबाहेरून विविध भागातून त्यांनी तुळशीच्या विविध प्रकाराचा संग्रह केला आहे. ही झाडे लावत असताना त्याचे संगोपन वैज्ञानिक पद्धतीने केले आहे. नियमित माती तपासणी, गरजेनुसार कीटकनाशकाची फवारणी तसेच विविध खतांचा उपयोग त्यांनी केला आहे. 

सध्या त्यांच्या बागेत एक हजार तुळशीची रोपे आहेत. दर महिन्याला शंभर ते दोनशे रोपे तयार करून ते इतरांना मोफत देतात. तुळशीला वैज्ञानिक दृष्ट्या समजून घ्यावे व इतर झाडांप्रमाणे लागवड करावी यासाठी ते प्रयत्न करतात. 
तुळशीपासून अनेक प्रकारची औषधे केली जातात. मात्र, प्रत्यक्षात तुळशीची पाने नेहमी सेवन करण्याच्या माध्यमातून जिवनशैली आरोग्यदायी बनते. इतर आयुर्वेदिक औषधांमध्ये तुळस भरपूर वापरली जाते. 
इतर राज्यातील तुळशीची झाडे त्यांनी लावली आहे. मात्र त्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करावे लागते तरच ही झाडे टिकतात. लाल पानांची किंवा पिवळ्या पानांची तुळस महाराष्ट्रात दुर्मिळच आहे. पंढरपुरातील तुळशी बाग पाहून त्याचा अभ्यास श्री. होमकर करीत आहे. केवळ तुळशीला पाणी घालणे उपयुक्त नाही तर गरजेनुसार त्याला खतेही दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

झाडाबद्दल अंधश्रध्दा 
काही कारणाने तुळस जळाली असे म्हटले जाते. पण ही अंधश्रध्दा आहे. तुळशीचे आयुष्य दोन वर्षाचे असते. नंतर तुुळशीचे खोड म्हणजे काष्ठ होते. तेव्हा तुळशीचे आयुष्य संपले असे समजून दुसरी तुळस लावली पाहिजे. वाळलेल्या काष्ठापासून तुळशीच्या माळा तयार केल्या जातात. 

शास्त्रशुध्द जोपासना महत्वाची 
तुळशीची झाडे उपयुक्त आहेत. त्यापासून अनेक घरगुती औषधी तयार करता येतात. तुळस पानाचे नियमित सेवन उपयुक्त आहे. 
- अरुण होमकर, नामदेव नगर, भवानीपेठ सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com