esakal | कोंढेजच्या गौराई उत्सवातून हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन

कोंढेजच्या गौराई उत्सवातून हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन

sakal_logo
By
गंगाधर पोळ

चिखलठाण (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील कोंढेज येथील तांबोळी कुटुंबामध्ये गेल्या अठरा वर्षांपासून गौराई पूजनाची परंपरा पाळली जात असून एका मुस्लिम समाजाच्या परिवाराकडून मोठ्या भक्तिभावाने साजरा होणाऱ्या या उत्सवात गावातील इतर महिला आवर्जून सहभागी होत असल्याने यावेळी गावात हिंदू- मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन घडत असते.

हेही वाचा: सोनपावलांनी आगमन झालेल्या गौरीसमोर विद्युत रोषणाई

अठरा वर्षांपूर्वी येथील गावातील विहिरीचा गाळ काढलेल्या ठिकाणी आमीन तांबोळी यांची लहान बहीण असमा यांना चिखलात माखलेली एक गोलाकार वस्तू दिसली. खेळण्याचा चेंडू समजून तिने तो घरी आणला. पाण्याने धुतल्यानंतर ती एक गौराईची मूर्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी गावातील जेष्ठ मंडळींना ही गोष्ट सांगितली. त्यांनीही काही दिवसांपूर्वी कुणीतरी विसर्जित केलेली गौराईची मूर्ती असावी ती तुम्हाला सापडली आहे. आमच्या हिंदूंच्या कोणाला सापडली असती तर तिची नियमित गौराई काळात बसवून पूजा केली असती.

हेही वाचा: 'सगळे पक्ष हिंडून आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये!'

तुम्ही मुस्लिम समाजाचे असल्याने आता तुम्हीही तिचे पूजन करून कोठेतरी पाण्यात विसर्जित करा, असा सल्ला दिला. परंतु, आपणही ही गौराई सणाच्यावेळी आपल्या घरी इतरांप्रमाणे बसवून तिची पूजा करावी, अशी इच्छा आस्मा यांनी व्यक्त केली. त्यावेळी आई नुरजहा व वडील युन्नुस तांबोळी यांनी तिला परवानगी दिली. त्या वर्षीपासून त्यांच्या घरी इतर हिंदू रिवाजाप्रमाणे गौराई पूजनाचा सण उत्साहात साजरा केला जाऊ लागला आहे. अठरा वर्षांपासून अखंडीतपणे ही परंपरा तांबोळी परिवारातील मंडळींनी सुरू ठेवली आहे.

हेही वाचा: Solapur : विठ्ठलवाडीत शंभर टक्के लसीकरण पूर्ण

"ईश्वर आणि अल्ला एकच आहे, अशी आमच्या परिवाराची श्रद्धा आहे. आमचे मुस्लिम सण आम्ही ज्या उत्साहात साजरा करतो, त्याच उत्साहात गौराईचा सणही साजरा करतो. त्यामधून आम्हाला आनंद मिळतो. त्यामुळे आम्ही गौराईची परंपरा सुरूच ठेवली आहे."

- अमीन तांबोळी, कोंढेज, ता. करमाळा

loading image
go to top