Pahalgam Attack: सोलापुरात पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून जाळला; तीव्र निदर्शने, सकल हिंदूंकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

‘एक है तो सेफ है’, ‘ते धर्म विचारून मारतात तर तुम्ही धर्म विचारून वस्तू खरेदी करा’ असे बॅनर युवकांच्या हातात झळकले. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
Protesters in Solapur burn Pakistani flag in response to the Pahalgam terror attack; strong condemnation from Hindu organizations.
Protesters in Solapur burn Pakistani flag in response to the Pahalgam terror attack; strong condemnation from Hindu organizations.Sakal
Updated on

सोलापूर : पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात २७ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याविरोधात सोलापुरातील सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेत हुतात्मा चौकात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी केली. यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून जाळण्यात आला. हल्ल्यातील मृतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com