esakal | करमाळ्यात 'तिरडी मोर्चा' काढत पालकमंत्री भरणे यांचा निषेध

बोलून बातमी शोधा

karmala

करमाळा तालुक्यातील केत्तुर येथे उजनीच्या पाण्यात उतरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शनिवारी तिरडी मोर्चाकाडून निषेध करण्यात आला.

करमाळ्यात 'तिरडी मोर्चा' काढत पालकमंत्री भरणे यांचा निषेध
sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : उजनी धरणातून इंदापुरसाठी पाच टीएमसी उचलण्याच्या फाईलवर मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी सही करून घेण्यात सोलापूरचे पालकमंञी दत्ताञय भरणे यशस्वी झाले आहेत. माञ इंदापुरला पाच टीएमसी पाणी उचलण्याच्या निर्णयाविरोधात अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील केत्तुर येथे उजनीच्या पाण्यात उतरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शनिवारी (ता. २४) तिरडी मोर्चाकाडून निषेध करण्यात आला.

हेही वाचा: प्रणितींना पालकमंत्री करण्याची मागणी ! भरणे म्हणाले ...तर मंत्री व आमदारकीचा राजीनामा देईन

अतुल खुपसे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या उजनी धरणातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाच टीएमसी इंदापूर तालुक्याला पाणी घेऊन जाण्याचा घाट घातला आहे. हे पाणी नेण्यासाठी मंजुरीही मिळाली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध योजना उजनीवर अवलंबून आहेत. पाणी सोडण्यावरून कित्येक वेळा मारामारी झाली आहे. यंदा उजनीत पुरेशा प्रमाणात पाणी असल्याने सर्व आवर्तन वेळेवर सोडण्यात आल्याने पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार नाही. यापूर्वी योजनेतून बारामतीसाठी पाणी नेण्यात आले होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यावरील स्थगिती उठवून पाणी उचलण्यास सुरूवात केली आहे. आता उजनीतून इंदापूरसाठी पाणी नेत आहेत. याचा आम्ही निषेध करत असल्याचे खुपसे यांनी सांगीतले.

हेही वाचा: ऑक्‍सिजन निर्मितीबाबत साखर कारखाने सकारात्मक : पालकमंत्री भरणे

पालकमंत्री भरणे यांचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विठ्ठल मस्के, राणा महाराज, जयसिंग पाटील, अतुल राऊत उपस्थित होते. उजनी जलाशयात उतरून आंदोलन केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला.

हेही वाचा: बार्शीकरांनो, कोरोनाची साखळी तोडा : पालकमंत्री भरणे

उजनी धरणात सोलापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्य़ातील शेतक-यांच्या जमीनी गेल्या आहेत. या धरणात सर्वाधिक जमीन करमाळा तालुक्यातील गेली आहे. माञ उजनीचे पाणी अनेकांनी पळवले असा करमाळातील शेतक-यांचा आरोप आहे. आता कुठे लोकांना भीमा-सीना बोगद्याच्या पाण्याचा विसर पडायला लागला होता. त्याच पाच टीएमसी पाणी इंदापूर (जि.पुणे ) साठी दिल्याने करमाळ्यातील शेतकरी वर्गात नाराजी आहे. याशिवाय मराठवाडय़ाला पाणी देण्यासाठीही बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. या बोगद्यातून जाणा-या पाण्याविषयी कोण का बोलत नाही? हे सर्व चित्र पाहता उजनीत नेमके किती पाणी उरणार? ज्यांच्या जमीनी उजनीत गेल्या त्या धरणग्रस्तांना तरी उजनीचे पाणी मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न येथील शेतक-यांना पडले आहेत.