कोरोनामुक्‍त गावांमध्ये 'पारावरील शाळा'!

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवून त्यांच्यातील शिक्षणाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी "पारावरील शाळा' हा उपक्रम राबविला जाणार आहे.
school start
school startSakal
Summary

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवून त्यांच्यातील शिक्षणाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी "पारावरील शाळा' हा उपक्रम राबविला जाणार आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) दोन हजार 798 शाळांमधील दोन लाख एक हजार 788 विद्यार्थ्यांपैकी 75 हजार 371 मुलांच्या पालकांकडे अॅन्ड्राइड मोबाइल (Android Mobile) नाहीत. तर ऑनलाइनमुळे मुलांवर विपरित परिणाम झाल्याने काही पालकांनी यापूर्वीच मुलांचे ऑनलाइन शिक्षण (Online teaching) बंद केले आहे. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवून त्यांच्यातील शिक्षणाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी "पारावरील शाळा' हा उपक्रम राबविला जाणार आहे.

school start
सोलापूर : नव्या पोलीस निरीक्षकांकडून चोरट्यांच्या बंदोबस्ताची अपेक्षा

सध्या सोलापूर (Solapur) शहरात कोरोनाचे (Corona) एक हजार 196 तर ग्रामीणमध्ये एक हजार 106 सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामीणमधील बार्शी, पंढरपूर या तालुक्‍यांमध्ये रुग्णवाढ अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत जास्त आहे. तर दुसरीकडे शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विशेषत: प्रभाग 15,16,21,23 व 24 मध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढणारी गावे, नगरांना वगळून कोरोनामुक्‍त गावांमध्येच हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. यापूर्वीही हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बहुतेक मुख्याध्यापक, शिक्षकांनी यशस्वी करुन दाखविला. त्याचे कौतूक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यासह शालेय शिक्षणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. आता कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याने शाळा पुन्हा बंद झाल्या असून त्या पुन्हा कधी सुरु होतील हे निश्‍चितपणे सांगणे कठीण आहे.

शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली, घरात राहून एकलकोंडी झालेली मुले आनंदीही झाली. मात्र, शाळा बंद झाल्याने पालकांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव घेऊन शाळा सुरु करण्याची पत्राद्वारे मागणी केली. तरीही, संसर्गाची गती अधिक असल्याने मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळा बंदचा निर्णय कायम ठेवण्यात आला. आता, पालकांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील जवळपास दोनशे कोरोनामुक्‍त गावांमध्ये फेब्रुवारीपासून "पारावरील शाळा' हा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु, जानेवारीनंतर कोरोना संसर्गाचा अंदाज घेऊन हा उपक्रम राबविला जाणार आहे.

school start
सोलापूर विद्यापीठाची 24 जानेवारीपासून ऑनलाइन परीक्षा!

पारावरील शाळेसाठी निकष...

- मोकळ्या जागेत भरवावी शाळा; दोन मुलांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे

-15 वर्षांवरील सर्व मुलांनी कोवॅक्‍सिनचा पहिला डोस घेतलेला असावा

- शिक्षकांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत; सर्वांसाठी मास्कचे बंधन

- कोरोनामुक्‍त गावांमध्ये सुरु होतील शाळा; ऍन्ड्राइड मोबाइल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

- गर्दी होईल असा उपक्रम नकोच; दोन-तीन तासांसाठीच असावी पारावरील शाळा

जिल्ह्यातील अनेक मुलांच्या पालकांकडे ऍन्ड्राइड मोबाइल नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नसल्याने त्यांच्यासाठी यापूर्वी "पारावरील शाळा' हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. परंतु, सध्या 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीही, 31 जानेवारीनंतर कोरोना संसर्गाचा अंदाज घेऊन शासनाच्या मान्यतेने तो उपक्रम सुरू करता येईल.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com