लक्षणे नसलेल्यांवर घरीच उपचार! सलग तीन दिवस ताप नाही आला तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Isolation

लक्षणे नसलेल्यांवर घरीच उपचार! सलग तीन दिवस ताप नाही आला तर...

सोलापूर : शहरातील महापालिकेच्या सद्यस्थितीत बॉईज हॉस्पिटलमध्ये 31 तर सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल ) 50 रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या 81 रुग्णांपैकी सिव्हिल हॉस्पिटलमधील (Civil Hospital) केवळ आठ रुग्णांनाच ऑक्‍सिजनची (Oxygen) गरज भासली आहे. लक्षणे नसलेल्यांपैकी ग्रामीणमधील 92 तर शहरातील जवळपास 100 रुग्ण कोणतीही लक्षणे नसल्याने घरीच (Home isolation) उपचार घेत आहेत. परंतु, त्यासाठी रुग्णाच्या घरी राहण्याची व स्वच्छतागृहाची स्वतंत्र सोय असावी, एवढीच अट आहे.

हेही वाचा: सिव्हिल हॉस्पिटल हवेतून करणार अॉक्सीजन निर्मिती

सोलापूर शहरात 248 तर ग्रामीणमध्ये 231 सक्रिय रुग्ण (Active patient)असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोनाची (Corona) तिसरी लाट अजूनपर्यंत ठराविक जिल्ह्यांपुरतीच मर्यादित आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नाशिक (Nashik), पुणे (Pune), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. रुग्ण वाढत आहेत, परंतु लस घेतलेल्यांमधील रोगप्रतिकारक शक्‍तीमुळे (Immunity system) त्यांना ऑक्‍सिजनची गरज भासत नसल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने (Health Department) नोंदवले आहे. दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यापर्यंतच रुग्णवाढ मोठी असेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. जिल्ह्यातील 15 वर्षांवरील 36 लाख 40 हजार 812 जणांपैकी 28 लाख 80 हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील 17 लाख 29 हजार व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील अडीच लाखांपैकी जवळपास 35 हजार मुलांनी कोवॅक्‍सिनचा (Covacin) पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला, तरीही मागील दोन्ही लाटांप्रमाणे हालत होणार नाही, असा विश्‍वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे. जिल्ह्यात ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर (Ventilator) पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शहरातील वाडीया हॉस्पिटल, बॉईज हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जवळपास 460 बेड्‌स आहेत.

हेही वाचा: सोलापुरातील सिव्हिल, अश्विनी, यशोधरा  डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्‍चित 

जिल्ह्यातील सद्यस्थिती...

- एकूण सक्रिय रुग्ण- 479

- रुग्णालयात दाखल रुग्ण- 287

- अंदाजित होम आयसोलेशनमधील रुग्ण- 192

- सिव्हिलमधील ऑक्‍सिजनवरील रुग्ण- 8

रुग्णांवरील उपचाराचे निकष....

- लक्षणे नसलेल्या रुग्णाला कोविड केअर सेंटर किंवा घरी ठेवून उपचार करता येतील

- सात दिवसांत सलग तीन दिवस ताप न आल्यास रुग्णाला घरी सोडता येईल

- मध्यम लक्षणे असलेल्यांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले जाईल

- सलग तीन दिवस त्या रुग्णाची ऑक्‍सिजन लेव्हल 93 पेक्षा अधिक असल्यास आणि त्याला काहीच त्रास नसल्यास मिळेल डिस्चार्ज

- बीपी, शुगर, कर्करोग असलेल्या रुग्णाला ऑक्‍सिजन लागतो, त्याशिवाय त्याला त्रास होतो, त्याच्यातील लक्षणे कमी झाल्यास व बीपी, शुगर कंट्रोल झाल्यावर घरी सोडणार

- पूर्वीचा आजार असलेल्या रुग्णास कोरोना झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन घरी सोडले जाईल; त्यानंतर सात दिवस त्याच्यावर राहणार वॉच

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी तीनशे बेड्‌सची सोय आहे. सध्या 50 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील आठ रुग्णांना ऑक्‍सिजन लावला आहे. हॉस्पिटलमध्ये सध्या 30 मे.टन ऑक्‍सिजन साठा आहे.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top