झेडपीत दोन दिवसांत लाचलुचपतच्या दोन कारवाया! मुख्याध्यापकाकडेच मागितली लाच | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपीत लाचलुचपतच्या दोन कारवाया! मुख्याध्यापकाकडेच मागितली लाच
झेडपीत लाचलुचपतच्या दोन कारवाया! मुख्याध्यापकाकडेच मागितली लाच

झेडपीत लाचलुचपतच्या दोन कारवाया! मुख्याध्यापकाकडेच मागितली लाच

सोलापूर : राज्य सरकारच्या (State Government) पती-पत्नी एकत्रिकरण योजनेअंतर्गत जवळच्या शाळेत रिक्‍त असलेल्या मुख्याध्यापक पदी बदली होण्यासाठी तक्रारदाराने प्राथमिक शिक्षण विभागाला अर्ज दिला होता. त्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास अण्णाराव चेळेकर याने 25 हजारांची लाच (Bribe) मागितली. पहिल्या टप्प्यात 15 हजारांची लाच द्या, अशा संभाषणावरून चेळेकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption bureau) अटक केली.

हेही वाचा: सिद्धिविनायक, शिर्डी सुटले; कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यासाठी 30 हजारांची लाच घेताना समाज कल्याण विभागातील बसवराज स्वामी याला दोन दिवसांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी चेळेकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. जिल्हा परिषदेतील समाज कल्याण, शिक्षण, बांधकाम या विभागात सर्रासपणे लाच घेण्याचे प्रकार सुरू असल्याचे या कारवयांतून स्पष्ट झाले आहे. चेळेकर याने तक्रारदाराकडे 25 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. जवळील शाळेत मुख्याध्यापक पदी बदली होण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. त्यासंदर्भात 8 ऑक्‍टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. दरम्यान, तक्रारदाराने चेळेकरचे संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार प्रमोद पकाले, अतुल घाडगे, गजानन किणगी, श्‍याम सुरवसे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. चेळेकरविरुद्ध आता निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: तरुणांमध्ये भरणे ठरले हिरो! MPSC उमेदवारांची वाढली वयोमर्यादा

बळिराम साठेंचे वक्‍तव्य खरेच...

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान विरोधी पक्षनेते बळिराम साठे यांनी जिल्हा परिषद ही टक्‍केवारीचा अड्डा बनली असून लाच घेण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले होते. अनेक विभागांमध्ये लाच मागण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा झाली. आता तीन दिवसांतील दोन घटनांमुळे जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्यांना कामे करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते, यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे काय ठोस पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top