

Borewell Pump Removal Machine Leads to Multi-Crore Business Success
sakal
-विरण कुलकर्णी
मोडनिंब: बोअरमधील नादुरुस्त पंप काढण्याच्या अडचणीतून सुचलेल्या जुगाडाने एका तरुणाचे आयुष्यच बदलले. जाधववाडी (मो.) येथील केवळ बारावी पास असलेल्या धनाजी सुर्वे यांनी केलेल्या देशी जुगाडातून कोटींचा उद्योग उभारला आहे. याने अनेकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. देशभर स्टार्ट अपचे वारे वाहत असताना ‘आम्हीही काही कमी नाही’ याचा संदेशच छोट्या गावातील धनाजीने दिला आहे.