अन्‌ सोलापूर बसस्थानक पुन्हा गजबजले ! "या' जिल्ह्यांसाठी धावताहेत गाड्या

St Stand
St Stand

सोलापूर : नेहमी गजबलेले सोलापूर बसस्थानक कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून सुनेसुने झाले होते. 22 मार्चपासून एसटी बस बंद असल्याने अनेक महिने अत्यंत कामी प्रमाणात व तुरळक गर्दी असलेले शहर बसस्थानक गुरुवारपासून आंतरजिल्हा प्रवासास परवानगी मिळाल्याने पुन्हा गजबजू लागले आहे. 

राज्य शासनाने एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेताच मुख्य बसस्थानकावर प्रवासी, बसगाड्या, ऑटोचालक तसेच परवानाधारक दुकानदारांची वर्दळ सुरू झाली आहे. सुमारे पाच महिन्यांनंतर गुरुवारी (ता. 20) सोलापूर एसटी बसस्थानकातून पुन्हा गजबजले. गुरुपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार अशी घोषणा झाल्यानंतर सोलापूर बसस्थानकाची यंत्रणा कामाला लागली. बसस्थानकाचा परिसर निर्जंतुक करण्यात आला. सकाळपासून पुण्याला जाण्यासाठी बस दर दोन तासाला बस वाहतूक सुरू झाली आहे. मोठ्या संख्येने प्रवासी इतर गावांना जाण्यासाठी स्थानकावर पोचत होते. रिक्षा प्रवाशांना घेऊन स्थानकावर येत आहेत. 

पुणे शहरासोबतच औंरगाबाद, नगर, लातूर, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत जाण्यासाठी बस प्लॅटफॉर्मवर थांबत आहेत. प्रवाशांनी केलेल्या चौकशीनुसार इतर गाड्या सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. अगदी लांब पल्ल्याच्या गाड्या अद्याप सुरू झाल्या नसल्या तरी मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व इतर मुख्य शहरात जाणाऱ्या मार्गावरील बसस्थानकापर्यंत बस सोडण्यात आल्या आहेत. तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणेच सामान्य आहेत. तसेच मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. स्थानकावर प्रवाशांना अंतर ठेवून बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिवसभराच्या वाहतुकीचा आढावा घेऊन अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे. 

ठळक... 

  • प्रवाशांच्या संख्येनुसार गाड्या वाढवणार 
  • एका बसमध्ये बावीस प्रवासी 
  • प्रवास भाडे पूर्वीप्रमाणेच 
  • मास्क व सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक 

विजयपूर येथील रहिवासी रवींद्र हंचाटे म्हणाले, मला कोल्हापूरला नातेवाइकांच्या भेटीसाठी तातडीने जायचे होते. बससेवा सुरू झाल्याचे समजल्याने थेट स्थानकावर आलो आहे. चौकशी केली असता गाडी उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगितले. 

प्रवासी श्रीदेवी तोडकर म्हणाल्या, इतर जिल्ह्यात जाण्यासाठी बससेवा सुरू होणार असल्याचे समजले. स्थानकात विचारणा केली असता त्यांनी बस उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. बससेवा सुरक्षित असल्याने प्रवासासाठी बाहेर पडता आले. 

बसचालक संगमेश्‍वर जाधव म्हणाले, आजपासून बस सुरू होणार असल्याने सकाळीच कामावर हजर राहण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानुसार आता नियमित काम सुरू करणार आहे. 

वाहक इरफान किस्तगे म्हणाले, अक्कलकोट येथून पुणे येथे जाण्यासाठी बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे अक्कलकोट डेपोमध्ये कर्तव्यासाठी हजर झालो. 

व्यवसाय परवानाधारक संघटनेचे अध्यक्ष अमर कटारे म्हणाले, बससेवा बंद राहिल्याने आमची रोजीरोटी बुडाली होती. आता बस सुरू झाल्याने स्थानकातील सर्व परवानाधारक व्यावसायिकांचे उत्पन्न सुरू होईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com