esakal | अन्नछत्र मंडळाच्या सेवेत "जय हिंद'चा पुढाकार ! शहरातील गरजूंना केले अन्नदान
sakal

बोलून बातमी शोधा

Jai Hind Food Bank

अन्नछत्र मंडळाच्या सेवेत "जय हिंद'चा पुढाकार ! शहरातील गरजूंना केले अन्नदान

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना पुन्हा एकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गरजूंना प्राप्त परिस्थितीत न्यासाकडून अन्नदान सेवा सुरू झाली आहे. जय हिंद फूड बॅंक यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर व परिसरातील निराधार व अत्यंत गरजू लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दरम्यान, याचा प्रारंभ रविवारी (ता. 18) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍याम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाटगे, शहाजी यादव, जय हिंद फूड बॅंकचे अंकुश चौगुले, अशोक जाधव, योगेश पवार, आतिष पवार, हिरा बंदपट्टे, मुदई तांबोळी, आकाश चौगुले, महेश लिंबोळे, सोनू कांबळे, शिवा चौगुले, फहिम पिरजादे यांच्यासह वैभव मोरे, राहुल शिंदे, महांतेश स्वामी, गोविंद शिंदे, चंद्रकांत हिबारे, विकी पवार, सागर पवार, मलंग मकानदार, मल्लिकार्जुन गवळी, राजू झंपले, संभाजीराव पवार, अक्षय पवार, पप्पू वाकडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना आता दोन महिन्यांची सुट्टी !

यापुढे अक्कलकोट शहरातील इतरांना अन्नदान सेवा करायची असल्यास अंकुश चौगुले (9960662424), अशोक जाधव (9403487898), योगेश पवार (8208065494), हिरा बंदपट्टे (8007114499), आतिश पवार (7058327557) यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय हिंद फूड बॅंकच्या स्वयंसेवकांनी रविवारी संपूर्ण अक्कलकोट शहरात गोरगरीब, गरजू लोकांपर्यंत अन्न पोचवले. यात डीएड कॉलेजच्या पाठीमागील झोपडपट्टी परिसर,

हेही वाचा: माजी मंत्र्यांनी नातेवाइकाचा विवाह ढकलला पुढे ! सोलापुरात एप्रिलमध्ये एकही विवाह नाही

पाणी टाकीच्या बाजूला असलेला झोपडपट्टी परिसर, अक्कलकोट शहरातील वडार गल्ली, ग्वाल वस्ती, ढाले वस्ती, मोरे वस्ती, संजयनगर, शक्तीदेवी कट्ट्याजवळ, खासबाग गल्ली, श्री साई समर्थ चौक व परिसरातील गरजूंना अन्न वाटप करण्यात आले. यात भात, आमटी व शिरा हे पदार्थ होते.