बार्शी : पानगाव (ता. बार्शी) येथील पती-पत्नी हडपसर पुणे येथे मुलाकडे एस.टी. बसमधून जाताना चोरट्यांनी पर्सचा कप्पा कापून नेकलेस व राणीहार २७ ग्रॅम सोन्याचे दागिने अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.