

Ladki Bahin Scheme Maharashtra Government to Verify 1907 Beneficiaries With Government Employees in Family Before Recovering Aid
sakal
सोलापूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १९०७ लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरदार असल्याची माहिती ‘ई-केवायसी’तून समोर आली आहे. अशांची नावे व त्या कर्मचाऱ्यांचा शासकीय विभाग नोंद करून ६३ पानांची यादी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पाठविली आहे.