
करमाळा : अर्जुननगर (ता. करमाळा) येथे जावयाच्या शेतातील बांधावरील झाड तोडून चारीत का टाकले, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या चुलत्याचा त्यांच्याच पुतण्यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ व मारहाण करून छातीत चाकू भोसकला. जखमीला करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.