Wadala land grabbing case: Nephew cheats aunt using debt fear; police complaint filed.
सोलापूर : ‘डोक्यावरील सावकाराचे कर्ज वाढले आहे, तो कर्ज परत देण्यासाठी तगादा लावत असल्यामुळे मला आत्महत्या करावी लागेल’ अशी भावनिक भीती घालून भाच्याने आत्याची जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी छाया शंकर शिरसट (रा. एकता नगर, जुने वालचंद कॉलेजजवळ, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून शरद अशोक गायकवाड (रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.