

Angry citizens lock Mangalvedha land records employees inside the office over delayed services.
Sakal
मंगळवेढा : येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत, कामासाठी ताटकळत ठेवले जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. हा प्रकार सोमवारी (ता. १) सायंकाळच्या सुमारास घडला. या संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे अधिकचा तपशील मिळू शकला नाही.