Aviation Alert: Strict Visibility Criteria Introduced for Aircraft Landing
Sakal
सोलापूर
माेठी बातमी! पाच हजार मीटरवरून दृश्यमानता असेल तरच लॅंडिंगला परवानगी; नाईट लॅंडिंगसाठी विमानतळावर ८०० मीटरची अट..
India airport landing visibility guidelines: सोलापूर विमानतळावर नाईट लॅंडिंगसाठी ८०० मीटर दृश्यमानतेची अट; बारामतीत दुर्घटना
सोलापूर: पाच हजार मीटरवरून दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) असेल तरच विमान लॅंड करण्यास धावपट्टीवर उतरण्यास परवानगी देण्यात येते. पावसाळा व हिवाळ्यात अशी परिस्थिती अधिक तयार होते. ज्या विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा नाही, त्याठिकाणी असा निर्णय घेण्यात येतो. ज्या विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा आहे, त्या विमानतळावर दृश्यमानतेची अट ५ हजार ऐवजी ८०० मीटर इतकी असल्याचे डीआयजीसीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

