Latur : विकासावरील चर्चेत नागरिकांचाही सहभाग

तुळजापुरातील आराखडा बैठकीत अधिकाऱ्यांना विचारले प्रश्न, आमदार पाटील यांचीही उपस्थिती
Latur news
Latur newsesakal

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरासह शहराच्या विकास आराखड्याबाबत झालेल्या बैठकीत सोमवारी ता.३१ विविध प्रश्नांची मांडणी अनेकांनी केली.तुळजाभवानी मंदिरासह शहर विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात बैठक झाली.

Latur news
Latur : बिदर, अदिलाबादहून पंढरपूरला जादा रेल्वे

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार राणजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तुळजाभवानी मातेचे महंत तुकोजीबुवा आदी उपस्थित होते.

Latur news
Latur : हमीभाव समिती करणार पंतप्रधानांकडे शिफारस

यावेळी शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न तसेच मुलभूत आणि आवश्यक गरजांवर प्रकाश टाकण्यात आला. बैठक सुरू झाल्यानंतर विविध प्रश्न अनेकांकडून मांडण्यात आले. यामध्ये तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी दर्शनरांगा, अभिषेक रांग यासह विविध प्रश्नांची मागणी प्रशासनाकडे केली.

Latur news
Latur : शेतकऱ्यांचा कापूस येताच भाव गडगडले

दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाच्या वृषाली तेलोरे यांनी तुळजाभवानी मंदिराजवळ असणाऱ्या वीजवितरण कंपनीच्या रोहित्राबद्दल लक्ष वेधले. दरम्यान वीजवितरण कंपनीचे सहायक अभियंता गोदे यांनी बैठकीत सांगितले की, अनेक विजेच्या तारा अकरा वर्षा पूर्वीच्या आहेत.

Latur news
Latur : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे , उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे, नागेश साळुंके , उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, मकरंद प्रयाग, प्रकाश धट, बाळासाहेब कुतवळ , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एच. व्ही. होनमाने, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, सुधीर कदम, पोलिस निरीक्षक आदिनाथ काशीद, माजी नगरसेवक सुनील रोचकरी, रणजित इंगळे आदी उपस्थित होते. दरम्यान, तुळजापूर शहरातील विविध ठिकाणांची पाहणी वास्तुविशारद तसेच प्रशासन करणार असल्याचे सांगण्यात आले.

Latur news
Latur : कळंबमध्ये रंगली पंडित भाटे यांची ‘स्वरमैफल’

या आहेत मागण्या

तुळजाभवानी मातेच्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांसाठी अभिषेक दर्शन मंडप, वीजवितरणची व्यवस्थित सोय, तसेच स्वच्छतागृह यासह विविध मागण्या करण्यात आल्या. शहरात नवरात्राच्या अनुषंगाने जे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी येतात. त्यांच्यासाठी वेगळे यात्रा पोलिस संकुल करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. पोलिस कर्मचारी नवरात्रात आठ तास बंदोबस्त करतात. तथापि त्यांच्यासाठी चांगले विश्रांती कक्ष आवश्यक आहे यावरही चर्चा झाली.

Latur news
Latur : वीस हजार शेतकरी ‘केवायसी’

भाविकांच्या संख्येवर चर्चा

विद्यापीठ उपकेंद्रातील डॉ. सुयोग अमृतराव यांनी तुळजापूर शहरामध्ये येणारे भाविक तसेच पुजारी वर्गातील महिलांचा सहभाग याबाबत सादरीकरण केले. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह, व्यापारी यांच्या विविध विषयांवर चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com