Solapur News : "आपल्यातील दुर्गुणांची करू होळी दान करा पोळी" मोहोळ अनिसचे आव्हान

आपल्यात असणाऱ्या दुर्गुणाची होळी करा ,बोंबलणे व शिव्या देणे हे अनिष्टच आहे अशा अनिष्ट प्रथा आणि परंपरा म्हणून जतन करण्यापेक्षा अन्न होळीत जाण्या ऐवजी ते गरजूला दान करा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले.
Solapur News
Solapur Newssakal

मोहोळ : आपल्यात असणाऱ्या दुर्गुणाची होळी करा ,बोंबलणे व शिव्या देणे हे अनिष्टच आहे अशा अनिष्ट प्रथा आणि परंपरा म्हणून जतन करण्यापेक्षा अन्न होळीत जाण्या ऐवजी ते गरजूला दान करा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले.

महाराष्ट्रात अनेक सण परंपरे प्रमाणे साजरे होतात. त्या पैकीच होळी हा सण महत्त्वपूर्ण मानला जातो. नागरीक घरा समोर होळी पेटवून तर काही मंडळी चौका चौकात होळी पेटवून त्यामध्ये लाकडे, गौऱ्या जाळतात व पूजनाच्या वेळी पुरणपोळी नैवेद्य म्हणून होळीमध्ये जाळले जाते.

त्या ऐवजी आपल्या मध्ये असणाऱ्या दुर्गुणाची होळी करून, पोळ्या गरजूंना दान करून विधायक कार्य घडेल असा उपक्रम नागरिकांनी करावा असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मोहोळ च्या वतीने करण्यात आले आहे.

Solapur News
Solapur : बहुपीक पद्धतीने तीन गुंठ्यात ७५ प्रकारची पिके; हवामान बदलाला तोंड देण्यासाठी खैरेवाडीच्या भांगे यांचा प्रयोग

यावेळी सुधाकर काशीद राज्य सरचिटणीस, धर्मराज चवरे जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर ,श्रीधर उन्हाळे मोहोळ तालुका अध्यक्ष ,मोहन व्यवहारे मोहोळ कार्याध्यक्ष संजय भोसले,अॅड. विनोद कांबळे,मनोहर गोडसे,रमेश आदलिंगे , बिरमल खांडेकर ,संदीप साळवे ,राजेंद्र मोटे अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com