
Maharashtra police arrest two in ATM swap fraud; duo remanded to three days’ custody.
Sakal
सोलापूर: बाळे व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एटीएम केंद्रावर पैसे काढायला गेलेल्या दोघांच्या कार्डची अदलाबदल करून चौघांनी एक लाख १९ हजार ५९३ रुपये लंपास केले होते. फौजदार चावडी पोलिसांत १२ सप्टेंबरला दोन गुन्हे दाखल झाले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन संशयितांना जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.