esakal | ब्रेकिंग न्यूज! चौथ्या लॉकडाऊनची ठरली 'ही' तारीख; आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार नव्हे तर रुग्णसंख्येवरून ठरणार नियोजन?
sakal

बोलून बातमी शोधा

In Maharashtra lockdown planning will be based on the number of patients in the district

'या' जिल्ह्यांमधील सेवा सुरू होऊ शकतात
कोरोनामुळे मागील 55 दिवस झाले राज्य लॉकडाऊन आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली असून खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारला उत्पन्न मिळणारे उद्योग व व्यवसाय कमी-अधिक प्रमाणात सुरु केले जाणार आहेत. तत्पूर्वी, मागील 14 दिवसांत ज्या जिल्ह्यातील ग्रामीण व महापालिका परिसरात कोरोनाचे रुग्ण कमी आढळले आहेत, रुग्ण वाढलेच नाहीत, रुग्णांच्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे अशा जिल्ह्यांची माहिती संकलित करुन ठोस नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार भिवंडी-निजामपूर, पालघर, नाशिक महापालिका, नगर महापालिका, धुळे ग्रामीण, जळगाव महापालिका, नंदुरबार, सोलापूर ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, अकोला, ग्रामीण, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमधील उद्योग व व्यवसाय काही प्रमाणात सुरू होऊ शकतात. आता राज्याच्या सुरक्षिततेची (लॉकडाऊन) चावी जनतेच्या हाती असून त्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. 14) व आज (शुक्रवारी) महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून चौथा लॉकडाउन कसा असेल, या संदर्भात नियोजन झाले असून त्याची घोषणा उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

ब्रेकिंग न्यूज! चौथ्या लॉकडाऊनची ठरली 'ही' तारीख; आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार नव्हे तर रुग्णसंख्येवरून ठरणार नियोजन?

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात या विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असून मागील 14 दिवसांत राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 16 हजारांहून अधिक वाढली आहे. आता पावसाळा तोंडावर असल्याने विविध जिल्ह्यांमधील उद्योग- व्यवसाय सुरू करण्याबाबत राज्य सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता रेड, ऑरेंज ,ग्रीन झोनचा निकष बाजूला सारुन दुसऱ्या व तिसऱ्या लॉकडाउनच्या काळात ज्या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे अथवा घटली आहे, अशा जिल्ह्यांची माहिती सरकारने घेतली आहे. त्या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात उद्योग सुरू करण्याचे नियोजन मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले असून चौथा लॉकडाऊन 15 दिवस वाढवावा, असा सूर बैठकीत निघाला. त्याची घोषणा उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
संपूर्ण राज्यभरात एक मेपर्यंत 11 हजार 506  कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर त्यामध्ये मागील 14 दिवसांत 16 हजार 18 रुग्णांची भर पडली आहे. त्यानुसार 1 मे रोजी मुंबई महापालिका परिसरात सात हजार 812 बाधित रुग्ण आढळले होते. त्या ठिकाणी आता रुग्णांची संख्या 16 हजार 738 वर पोहोचली आहे. तर ठाणे महापालिका परिसरात 1 मेपर्यंत 438 रुग्णांची नोंद झाली होती, तर आता त्याच ठिकाणी एक हजार 215 रुग्ण सापडले आहेत. नवी मुंबईत एक हजार 113 रुग्ण आढळले आहेत. पुणे, मालेगाव, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अकोला या महापालिका परिसरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या महापालिका अंतर्गतच सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रावर आता अधिक लक्ष दिले जाणार असून विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस रणनीती आखली जात आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रतिबंधित क्षेत्रातील बंदोबस्त होणार अधिक कडक

राज्यात 14 मेपर्यंत 27 हजार 524 कोरुनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी एक हजार 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे सहा हजार 59 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत राज्यातील दोन लाख 40 हजार 145 व्यक्तींच्या कोरोना टेस्ट पूर्ण झाल्या असून त्यासाठी तब्बल 108 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन असून त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्यात उद्योग व व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन झाले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रतिबंधित क्षेत्रातील बंदोबस्त अधिक कडक केला जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत याची खबरदारी म्हणून त्यांना घरपोच सेवा देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा आणि आगामी नियोजनाचा अहवाल सरकारने मागविला आहे. त्यानुसार नियोजन केले जणार आहे.

हेही वाचा : सोलापूरचे नाव सोलापूरच का? जाणून घ्या कारण
'या' जिल्ह्यांमधील सेवा सुरू होऊ शकतात

भिवंडी-निजामपूर, पालघर, नाशिक महापालिका, नगर महापालिका, धुळे ग्रामीण, जळगाव महापालिका, नंदुरबार, सोलापूर ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, अकोला, ग्रामीण, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमधील उद्योग व व्यवसाय सुरू होऊ शकतात. मागील 14 दिवसांत भिवंडी-निजामपूर महापालिका परिसरात 22 नवे रुग्ण सापडले आहेत. पालघरमध्ये रुग्णांची संख्या 44 वरून आता 42 झाली आहे. नाशिक महापालिका परिसरात 14 दिवसांत नवे 25 रुग्ण सापडले आहेत. तर नगर महापालिका परिसरातील रुग्णांची संख्या 16 वरून आता 15 झाली आहे. तर धुळे ग्रामीणमध्ये मागील 14 दिवसांत अवघा एक रुग्ण सापडला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मागील 14 दिवसात 11 नवे रुग्ण सापडले असून जिल्ह्यातील रुग्ण संख्या 22 वरच थांबली आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाबाधित नऊ रुग्ण सापडले असून त्याची साखळी खंडित झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 25, सांगली जिल्ह्यात 43, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात तर परभणी जिल्ह्यात दोन, लातूर जिल्ह्यात 32 उस्मानाबाद जिल्ह्यात चार, बीड जिल्ह्यात एक, नांदेड ग्रामीणमध्ये पाच, अकोला ग्रामीणमध्ये 18, अमरावती ग्रामीणमध्ये पाच, बुलढाणा जिल्ह्यात 26, वाशीम जिल्ह्यात तीन, नागपूर ग्रामीणमध्ये दोन, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत प्रत्येकी एक तर चंद्रपूर जिल्ह्यात पाच रुग्ण सापडले आहेत. गडचिरोली एकमेव जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.

loading image