Dhangar Reservation: भाजपने धनगर समाजाला भरपूर दिले: खासदार वडकुते, मुख्यमंत्री फडणवीसांचे काम कौतुकास्पद

BJP Welfare schemesधनगर समाजासाठी आरक्षण, शिक्षण व विकासाच्या योजना राबवून भाजपने मोठे योगदान दिल्याचा खासदार रामराव वडकुते यांचा दावा; फडणवीसांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक
Ramrao Vadkute Credits BJP for Welfare Schemes for Dhangar Community in Maharashtra

Ramrao Vadkute Credits BJP for Welfare Schemes for Dhangar Community in Maharashtra

sakal

Updated on

सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेसची आमदारकी सोडून भाजपत प्रवेश केला. केंद्र व राज्य सरकारने धनगर समाजासाठी खूप योजना दिल्या. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने आदिवासींच्या २२ योजना धनगरांसाठी लागू केल्या. इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू लागले. चौंडी येथील विकासासाठी सरकारने ७०० कोटी दिले. अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण केले. वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दिले. भाजपने धनगर समाजाला खूप दिले, असे राज्यसभेचे भाजपचे खासदार रामराव वडकुते यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com