

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गट आणि जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या १३६ गणांसाठी शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली आ या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, अनेक नेत्यांचे नातेवाईक आणि प्रमुख राजकीय नेत्यांच्या नातलगांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आतापर्यंत ६० जागांचे निकाल हाती आले आहे त्यामध्ये ३९ जागा पटकावत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे पहिल्यांदाच भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे.