Officials conducting late-night search operations at locations linked to Shahaji Patil in Sangola.
Sakal
सोलापूर
माेठी बातमी ! 'शहाजी पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी धाडी'; सांगोल्यात उडाली खळबळ; रात्री उशिरापर्यंत तपासणी
late-night investigation: सूत्रांच्या माहितीनुसार, एका गोपनीय तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाटील यांच्या कार्यालयात तसेच अन्य संबंधित ठिकाणी कागदपत्रांची तपासणी, संगणक डेटा स्कॅनिंग आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केल्याची माहिती मिळते.
सांगोला : निवडणूक आयोगाच्या दोन भरारी पथकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला सोबत घेऊन सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासह एकूण चार ठिकाणी धाड घातली. यात एका ठिकाणी रोकड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी (ता. ३०) रात्री दहानंतर सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

