esakal | कलाशिक्षक मनोद वेदपाठक यांनी केली फलक लेखनातून कोरोना जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

कलाशिक्षक मनोद वेदपाठक यांनी केली फलक लेखनातून कोरोना जनजागृती

कोरोनामध्ये आपली जबाबदारी पार पाडत असताना कलाशिक्षक वेदपाठक यांनी केलेल्या सुंदर अक्षराचा कलेतून माचणूर ग्रामीण भागातील फलक लेखनातून अप्रतिम कोराना जनजागृतीचा संदेश दिला आहे.

कलाशिक्षक मनोद वेदपाठक यांनी केली फलक लेखनातून कोरोना जनजागृती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (सोलापूर) : "अजूनही बेरजेत आहे रुग्ण त्याचा गुणाकार नका करू, लागणार नाही वेळ आपला भागाकार होईल सुरू' अशा अनेक फलक लेखनातून माचणूर (ता. मंगळवेढा) येथील सिद्धेश्वर प्रशालेचे कलाशिक्षक मनोज वेदपाठक (manoj vedpathak) यांची फलक (board) लेखनातून कोरोनाविषयक जनजागृती (awareness) समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. कोरोनामध्ये (Corona) आपली जबाबदारी पार पाडत असताना कलाशिक्षक वेदपाठक यांनी केलेल्या सुंदर अक्षराचा कलेतून माचणूर ग्रामीण भागातील फलक लेखनातून अप्रतिम कोराना जनजागृतीचा संदेश दिला आहे.(manoj vedpathak an art teacher from machanur has raised awareness about corona by writing on the board)

हेही वाचा: ब्रह्मपुरी जगात सर्वांत उष्ण

कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात संकट आले. त्याचबरोबर जनताही हतबल झाली. प्रत्येकाला कोराना महामारीशी सामना करावा लागला. लहान बालकापासून ते वयोवृद्ध पुरुषांनाही या संकटात पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये तोंड द्यावे लागले असले तरी दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना जीव द्यावा लागला. आता दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तवली जात आहे. विशेषत: 18 वर्षाखालील मुलांना तिसरी लाट पोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा जगातील ‘हॉट’ शहरे

देशभरात प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, पत्रकार, सफाई कामगार, महसूल कर्मचारी, अशा अनेक कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून भूमिका निभावली असताना प्रशासनाने दिलेल्या आपत्ती निवारण कालावधीत देईल ती जबाबदारी शिक्षकांनीही पार पाडली आहे. तसेच समाजप्रबोधन कोरोना विषयक जनजागृती मोठ्या प्रमाणात शिक्षकांनीही विविध माध्यमातून केली आहे.

हेही वाचा: 44.2 अंश सेल्सिअससह ब्रह्मपुरी राज्यात "हॉट'

आपल्या कलाशिक्षक विषयातून कला करीत असताना रंगीत खडूने त्यांनी किमया करीत सुंदर अक्षरांनी फळा सजवित "अजूनही बेरजेत आहे रुग्ण त्याचा गुणाकार नका करू लागणार नाही वेळ आपला भागाकार होईल सुरू, मास्क वापरा...लस घ्या...सुरक्षित रहा...नियम पाळा... कोरोना टाळा प्रशासनास सहकार्य करा, आपण चुका करत गेलो, झाडे लावूया झाडे जगवूया, आज ( O2 ) महाग झालोय असा संदेश आपल्या फलकलेखन जनजागृती केली आहे. परिसरात विद्यार्थी, शिक्षक पालक वर्गात सततचे जनजागृती केली आहे. त्याबद्दल सर्व ग्रामीण भागातील शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गातून सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

loading image