
सोलापूर : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला मुंबईला येण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर व जिल्ह्यातून २५ हजार गाड्यांमधून मराठा समाजबांधवांचे वादळ मुंबईत धडकणार आहे. गुरुवारी (ता. २८) छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून सकाळी १० वाजता मराठा बांधव मुंबईकडे कूच करतील, असे माऊली पवार यांनी सोमवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत सांगितले.