

Devotees lining up for Swami Samarth darshan in Akkalkot as traffic congestion grips the town during holidays.
Sakal
अक्कलकोट: सलग सुट्ट्या व रजा काढून राज्यभरातील स्वामीभक्त अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात व अन्नछत्र मंडळात प्रचंड गर्दी करीत आहेत. भक्तांच्या गर्दीमुळे शनिवार (ता. १४) व रविवारी (ता. १५) वाहनांचीही विक्रमी गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. कमी मनुष्यबळ असले तरी पोलिस खाते वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा अतोनात प्रयत्न करीत होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सुमारे ५० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोन दिवस हजारो स्वामीभक्त स्वामीचरणी नतमस्तक होण्यासाठी अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते.