Solapur Crime
सोलापूर : शहरातील मोहसीन इस्माईल शेखसह इतरांना एमडी ड्रग्ज पुरविणाऱ्या तरुणाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत (मंगळवारी) पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याचा मोबाईलही जप्त केला आहे. फिरोज ऊर्फ मस्तान रसूल शेख (रा. परंडा, जि. धाराशिव) असे त्या तरुणाचे नाव आहे.