Solapur News : अखेर महाविकास आघाडीचं ठरलं बरं का| Meeting at Congress Bhavan Decision contest all upcoming elections together | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Municipal Corporation

Solapur News : अखेर महाविकास आघाडीचं ठरलं बरं का

सोलापूर : सोलापूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने महानगरपालिका निवडणूक, आणि केंद्रातील भाजप, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या जनता विरोधी धोरणाविरोधात एकत्र लढणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसभवन येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.

राज्यातील काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक झाली होती.

या बैठकीत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा, निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या जनता विरोधी धोरणाच्या विरोधात एकत्रितपणे विरोध करण्याची वज्रमुठदेखील या बैठकीत आवळण्यात आली.

या बैठकीस अनुसरून, गुरुवारी काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे, प्रमोद भोसले, सुनीता रोटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशानुसार, आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आणि जुन्या पेन्शन योजनेच्या आंदोलनात एकत्रितपणे सहभागी होणार असल्याचा निर्धार करण्यात आला.