Praniti Shinde : आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

दुष्काळी परिस्थितीत मागील जनावराच्या छावणी चालकाची बिले दिली नाहीत.त्यामुळे छावण्या चालवण्याबाबत छावणी चालकाची मानसिकता होणार नाही.त्यामुळे यंदा छावण्या तरी कशा सुरू होणार ? या सरकारकडून जनावराचा आणि माणसाचा पोटचा घास हिसकावून स्वतःचे पोट आणि खिसे भरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आ.प्रणिती शिंदे यांनी केला.
Praniti Shinde
Praniti Shinde sakal

मंगळवेढा : दुष्काळी परिस्थितीत मागील जनावराच्या छावणी चालकाची बिले दिली नाहीत.त्यामुळे छावण्या चालवण्याबाबत छावणी चालकाची मानसिकता होणार नाही.त्यामुळे यंदा छावण्या तरी कशा सुरू होणार ? या सरकारकडून जनावराचा आणि माणसाचा पोटचा घास हिसकावून स्वतःचे पोट आणि खिसे भरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आ.प्रणिती शिंदे यांनी केला.

काँग्रेस कार्यकर्त्याच्या मागणीनुसार तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीच्या निमित्ताने त्यांनी दक्षिण भागातील पाटकळ, खडकी, नंदेश्वर,भोसे,हुन्नूर, मानेवाडी, रड्डे सिद्धनकेरी, जालिहाळ, हाजापुर येथील ग्रामस्थांची संवाद साधला. या दौऱ्यात त्यांच्या समवेत धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, सुरेश कोळेकर, अॅड,नंदकुमार पवार,फिरोज मुलाणी,तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष मनोज माळी, युवक तालुकाध्यक्ष अॅड रविकरण कोळेकर अशोक चेळेकर विष्णुपंत शिंदे, पांडुरंग जावळे, मारुती वाकडे ,अजय अदाटे,सुलेमान तांबोळी, बापू अवघडे, नाथा ऐवळे, सुनीता अवघडे ,शाहीन शेख, जयश्री कौचाळे, शहाजी कांबळे संदीप पवार उपस्थित होते.

आ.शिंदे म्हणाल्या की, या भागातील पाणी प्रश्नाच्या संदर्भातील विषय माझ्याकडे कार्यकर्त्यांनी आणल्यानंतर मी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. या भागातील पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत मी या भागातील जनतेसोबत राहणार असल्याचे सांगत दहा वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मंजूर केलेल्या अनेक विकासकामातील पंढरपूर- विजयपूर हा रेल्वे मार्ग अद्याप मार्गी नसल्याचे सांगताना त्याबाबत सत्ताधाऱ्यांनी पाठपुरावा केला नाही म्हणून त्यांना दर पाच वर्षाला नवीन उमेदवार द्यावा लागतोय.

Praniti Shinde
Solapur News : अक्कलकोटचा पोलिस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

दुष्काळी निकषांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तालुके वगळण्यात आणल्याने मोठा अन्याय सरकारने केला असून तालुक्यात खरोखर दुष्काळी परिस्थिती असताना निकष बदलून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. तरच तालुक्याला छावण्या पाण्याचे टँकर सुरू होऊ शकतील. दुष्काळी परिस्थितीमुळे दूध दर देखील कमी झाल्यामुळे दूध व्यवसाय देखील संकटात सापडला.त्यांना आधार देणे गरजेचे आहे.

केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सध्याच्या काळात जनमानसात तीव्र मानसिकता तयार होत असल्याचे आ. शिंदे म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या त्या संदर्भातील काही तक्रारचे निरसन करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना मोबाईलवर वरून सूचना देखील दिल्या.

पाणी बंद केले आता अन्नही बंद करता का ?

भोसे येथे नागरिकांनी शिधापत्रिकावर धान्य मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर आ. शिंदे यांनी तहसीलदारांना यांना दूरध्वनीवरून या भागात दुष्काळी परिस्थिती असून पाणी नाही, तुम्ही रेशनचे धान्य देण्याचेही बंद करून कसं होईल ? असा सवाल उपस्थित केला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com