esakal | अखेर मूर्ती विसर्जनावेळी बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

अखेर मूर्ती विसर्जनावेळी बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

sakal_logo
By
चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ रेल्वे स्टेशनजवळील स्लीफर फॅक्टरीतील दीड दिवसाच्या गणेशोत्सवातील 'श्री'गणेश मुर्तीचे आष्टे बंधाऱ्यावरील सिना नदीच्या पात्रामध्ये शनिवार ता.11 रोजी विसर्जन करताना पाण्यामध्ये बुडालेला सौरभ सुभाष बेंबळगे (रा.लातुर) या युवकाचा मृतदेह कोळेगांव येथील स्थानिक मच्छीमाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने शोधुन काढण्यास चाळीस तासानंतर अखेर पोलीसांनी सोमवार ता.13 रोजी यश आहे।

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ स्टेशनजवळ रेल्वे रूळाखालील सिमेंटचे स्लीफर तयार करणाऱ्या कारखान्यातील गणेशाच्या मुर्तिचे विर्सजन करण्यासाठी शनिवार ता.11 रोजी कंपनीचे काही कामगार एका चारचाकी वाहनामध्ये सिना नदीवरील आष्टे बंधाऱ्यावर गेले होते. उपस्थित कामगारापैकी सौरभ सुभाष बेंबलघे हा युवक मोठ्या उत्साहाने श्री मुर्ती घेऊन नदीच्या खोल पात्रात उतरला. परिणामी पाण्याच्या वेगाचा व खोलीचा अंदाज न आल्याने क्षणातच सौरभ बेंबलघे हा पाहता पाहता नदीच्या पात्रात बुडाल्याने बेपत्ता झाला होता.याबाबतची खबर स्लीपर कंपनीतीलच प्रकाश पाटील यांनी पोलीसांना दिली होती.

हेही वाचा: पोटनिवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न - वडेट्टीवार

सदर पाण्यात बुडालेल्या युवकाला शोधण्यासाठी कोळेगांव येथील स्थानिक मच्छिमार अनुक्रमे ज्ञानेश्वर भुई, हरिचंद्र भुई, दत्ता भुई, लक्ष्मण भुई,सिंकदर पठाण,दिपक भुई,लक्ष्मण मल्लाव यांनी सलग शनिवार, रविवार व सोमवारी सकाळी या कालावधीत आष्टे बंधारा,कोळेगांव, शिरापुर बंधारा ते लांबोटीचा पुल आदी नदीपात्राच्या परिसरात बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचा उपलब्ध साधनानिशी प्रयत्न केला होता. सोमवारी ता .13 रोजी सकाळी अकराच्या सुमारास आष्टे येथील सदर दुर्घटना घडलेल्या ठिकाणापासुन नदीपात्रात सुमारे दीड ते दोन किलोमिटर अंतरावर कोळेगांव हद्दीत काटेरी बाभळीत अडकलेला मृतदेह मच्छीमार बांधवाना दिसुन आला.त्यांनी सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढुन पोलीसांच्या ताब्यात दिला.यावेळी सहाय्यक फौजदार शेख ग्रामरक्षक दलाचे दत्तात्रय मोटे,नदीकाठचे शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: भारतानं पूर्ण केला 75 कोटी लसीकरणाचा टप्पा; WHOकडून कौतुक

नदीपात्रात शोधकार्य करण्यासाठी कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसताना स्थानिक मच्छिमार बांधवानी मानवतेच्या दृष्टीने प्रशासनाला मदत करीत स्वतःचा जीव धोक्यात घालुन सदर पाण्यात बुडालेल्या बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह पाण्यातुन शोधुन काढण्यास मदत केली आहे. तरी प्रशासनाने याची योग्य दखल घेत सदर मच्छीमार बांधवांना सन्मानित करावे अशी अपेक्षा आसपासच्या गावातील नागरिकांनी व्यक्त केली .

loading image
go to top